शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

ग्रेन बेस डिस्टिलरी प्रकल्प; खराब धान्यापासून केली सॅनिटायझरची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:22 IST

माळी शुगर ग्रेन बेस प्रकल्पातून सॅनिटायझर बनवणारा पहिला कारखाना

ठळक मुद्देसॅनिटायझर मोलॅसीसपासून अल्कोहोलचे नसून ग्रेन बेसपासून तयार केलेल्या अल्कोहोलचे आहेया सॅनिटायझरमध्ये नियमानुसार सर्व घटकांचे मिश्रण केले असून ते निळ्या रंगात आहेजिल्ह्यात पहिलाच साखर कारखाना आहे की, ग्रेन बेसपासून सॅनिटायझर उत्कृष्ट दर्जाचे तयार करत आहे

श्रीपूर : दि सासवड माळी शुगर फॅक्टरीने खराब धान्यापासून अल्कोहोल काढून त्यापासून सॅनिटायझरची निर्मिती करणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे, असे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने साखर उद्योगाला सॅनिटायझर उत्पादन करण्यास परवाने दिले. राज्यातील ११० साखर कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत. यापैकी ८० अल्कोहोल निर्मिती प्रकल्प यावर्षी सुरु होते. या साखर कारखानदारांनी सॅनिटायझर बनवण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली. ज्या कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत, त्यांनी सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली.

सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा डिस्टिलरींना परवानगी दिली आहे. यामध्ये ग्रेन बेस डिस्टिलरी माळीनगर येथील सासवड माळी शुगर फॅक्टरी एकमेव आहे. याठिकाणी खराब व काळे झालेल्या ज्वारी, मका, तांदूळ, बाजरी आदी धान्यांचा वापर करून अल्कोहोल तयार केले जाते. धान्यापासून बनवलेल्या सॅनिटायझरचा वास सौम्य असल्यामुळे त्यापासून निर्माण झालेले सॅनिटायझर उत्कृष्ट प्रतीचे तयार होत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सॅनिटायझरची निर्मिती केली गेली. साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे १०० मिलिलिटरपासून पाच  लिटरपर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. कारखान्याने प्रोटेक्ट प्लस या नावाने सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले असल्याचे राजेंद्र गिरमे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रेन बेस एकमेव प्रकल्पसोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव ग्रेन बेस डिस्टिलरी प्रकल्पातून धान्यापासून अल्कोहोल काढून त्यापासून सॅनिटायझरची निर्मिती केली जाते. राज्यामध्ये सांगली, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी धान्यापासून सॅनिटायझर तयार केले जाते.

हे सॅनिटायझर मोलॅसीसपासून अल्कोहोलचे नसून ग्रेन बेसपासून तयार केलेल्या अल्कोहोलचे आहे. या सॅनिटायझरमध्ये नियमानुसार सर्व घटकांचे मिश्रण केले असून ते निळ्या रंगात आहे. जिल्ह्यात पहिलाच साखर कारखाना आहे की, ग्रेन बेसपासून सॅनिटायझर उत्कृष्ट दर्जाचे तयार करत आहे.- राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर, माळी शुगर फॅक्टरी

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेcorona virusकोरोना वायरस बातम्या