शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या रकमेसाठी शासनाचा हात आखडता, सोलापूर जिल्हा बँकेच्या मागणीकडे शासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:47 IST

कर्जमाफीची रक्कम देण्यासाठी शासन हात आखडता घेत असून दीड लाखावरील (ओ.टी.एस.)  थकबाकीदारांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा बँकेने ८ कोटी ८ लाख रुपयांची मागणी केली असताना शासनाने फक्त चार कोटी दिले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यातकाही शेतकºयांना केंद्र शासन कर्जमाफी करेल अशी अपेक्षा आहे तर काहींची पैशाची अडचण शासनाने दिलेले ६ कोटी ३२ लाख रुपये बँकेकडे शिल्लक असले तरी शासनाने खात्यावर जमा करण्यास परवानगीच दिली नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : कर्जमाफीची रक्कम देण्यासाठी शासन हात आखडता घेत असून दीड लाखावरील (ओ.टी.एस.)  थकबाकीदारांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा बँकेने ८ कोटी ८ लाख रुपयांची मागणी केली असताना शासनाने फक्त चार कोटी दिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना मागणीप्रमाणे निधी मिळत नसल्याचे दिसत आहे. दीड लाखावरील थकबाकीदारांनी दीड लाखापेक्षा अधिक असलेली रक्कम भरणा केल्याने त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा बँकेने ८ कोटींची रक्कम मागणी केली होती. शासनाने मात्र चार कोटी रुपये दिले आहेत. बँकेकडे यापूर्वीची दोन कोटी ३२ लाख रुपये इतकी रक्कम शिल्लक असून नव्याने आलेले चार कोटी दिले आहेत. बँकेकडे सध्या सहा कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असून ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर मात्र जमा करता येत नसल्याचे सांगण्यात आले. -------------------------जमा करण्याची परवानगीच नाही- जिल्हा बँकेच्या ओ.टी.एस.(दीड लाखावरील) साठी पात्र असलेल्या १५ हजार ११ शेतकºयांपैकी ५३९ शेतकºयांनी दोन कोटी ३२ लाख १८ हजार रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत. या ५३९ शेतकºयांच्या खात्यावर दीड लाख रुपयांप्रमाणे ८ कोटी ८ लाख ५० हजार  रुपये जमा करायचे आहेत. यासाठी शासनाने दिलेले ६ कोटी ३२ लाख रुपये बँकेकडे शिल्लक असले तरी शासनाने खात्यावर जमा करण्यास परवानगीच दिली नाही. -------------------पैसे भरण्यास निरुत्साह- ग्रीन’ यादीतील पात्र पैकी १५ हजार ११ शेतकरी ओ.टी.एस.चे आहेत. या शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली तरच दीड लाख रुपये शासन जमा करणार आहे; मात्र शेतकरी दीड लाखावरील रक्कम भरण्यास तयार नाहीत. काही शेतकºयांना केंद्र शासन कर्जमाफी करेल अशी अपेक्षा आहे तर काहींची पैशाची अडचण आहे. अनेकांची पैसे भरण्याची मानसिकताच नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूर