शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रुग्णवाहिकेमधील व्हायब्रेशन कमी करणाºया प्रकल्पास सरकारचे प्रशस्तिपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:07 IST

‘सिंहगड’च्या विद्यार्थ्यांचे संशोधन; देशभरातून ३७ बक्षिसे; केंद्र सरकारकडून कॉपीराईट प्रमाणपत्र

ठळक मुद्दे‘इनोवेटिव्ह मेथड टू रिड्युस व्हायब्रेशन इन अ‍ॅम्ब्युलन्स’ या प्रकल्पाला भारतातून ३७ बक्षिसे मिळालीसिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इनोवेटिव्ह मेथड टू रिड्युस व्हायब्रेशन इन अ‍ॅम्ब्युलन्स’ हा प्रकल्प सादर केला

शीतलकुमार कांबळे सोलापूर : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रुग्णाला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना अनेक अडचणी येतात. रुग्णवाहिकेला धक्के बसत असल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे कठीण होते. यामुळे त्या रुग्णाचे प्राण जाण्याचीही शक्यता असते. याला एक चांगला पर्याय म्हणून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इनोवेटिव्ह मेथड टू रिड्युस व्हायब्रेशन इन अ‍ॅम्ब्युलन्स’ हा प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारकडून कॉपीराईटचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

आपण कल्पना करु शकतो, एक अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला इंजेक्शन देताना किंवा आॅक्सिजन देताना जर रुग्णवाहिकेला धक्का लागल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जर एखादी स्त्री गर्भवती असेल तिला रुग्णवाहिकेतून घेऊन जाताना रुग्णवाहिकेमधील स्ट्रेचरला धक्का लागल्यास हे जीवावर बेतू शकते. गावातून शहराकडे जाणाºया रुग्णवाहिकेला तर आणखीनच अडचणींना सामोरे जावे लागते. शहरामध्ये ट्रॅफिक असल्यास रुग्णवाहिका इतर मार्गाने रुग्णालयाकडे जाते़ अशावेळी तिथे रस्ता कसा असेल हे सांगता येत नाही. जर रुग्णवाहिकेमधील स्ट्रेचरला रस्त्यांवरील खड्डे तसेच गतिरोधकामुळे धक्के बसले नाही तर..़ हा विचार सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. अविनाश लावणीस व त्यांचे विद्यार्थी विकास परमार, मोईन नदाफ, व्यंकटेश पारीख, दत्तात्रय म्हमाणे यांनी केला.

‘इनोवेटिव्ह मेथड टू रिड्युस व्हायब्रेशन इन अ‍ॅम्ब्युलन्स’ या प्रकल्पाला भारतातून ३७ बक्षिसे मिळाली आहेत. आयआयटी मुंबई, सीओई पुणे, टाटा टेक्नॉलॉजी, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी उदयपूर, एमआयटी आळंदी, स्टार्टअप इंडिया भारत सरकार, जेएसपीएम पुणे यासह सोलापुरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत झालेल्या स्पर्धेत या प्रकल्पास बक्षिसे मिळाली आहेत.

प्रकल्प कसे काम करतो ? सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पामध्ये चुंबक (मॅग्नेट) व सेन्सर यांचा वापर केला आहे. जर गाडी खड्ड्यामध्ये गेली तर गाडीची खालची बाजू व वरच्या बाजूमध्ये अंतर तयार होते. हे अंतर मॅग्नेटिक करंटने भरुन निघते. यामुळे रुग्णवाहिकेला कमीत कमी धक्के बसतात. रुग्णवाहिकेत असलेला रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी, स्ट्रेचर आणि इतर साधने यांना धक्का बसत नाही. यामुळे रुग्णवाहिकेतच रुग्णावर उपचार करणे अधिक सोपे होते.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राचार्य तसेच संस्थाचालकाचे मोलाचे सहकार्य मिळाले. हा प्रकल्प म्हणजे आमच्या एक वर्षाच्या कष्टाचे फळ आहे. सहा महिन्यांपूर्वी कॉपीराईटसाठी अर्ज केला होता. दोन दिवसांपूर्वी कॉपीराईटचे प्रमाणपत्र मिळाले आहे. एका खासगी कंपनीला आमची संकल्पना आवडली असून, येत्या काळात देशभरातील रुग्णवाहिकेत आमचा प्रकल्प वापरला जाईल. - प्रा. अविनाश लावणीस, मेकॅनिकल विभाग, सिंहगड अभियांत्रिकी 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय