शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Good News; मिरजहून निघालेली ट्रेन लातूरला पोहोचणार अवघ्या साडेतीन तासात

By appasaheb.patil | Updated: February 12, 2021 13:25 IST

मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण

ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरूदौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्याला जोडणारा मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शी या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या ताशी ८० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावल्यास मिरजहून लातूरला पोहोचण्यात अवघे तीन ते साडेतीन तास लागणार आहेत.

मागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. रेल्वे विभागाने ४ ऑक्टोबर २०१८ रोजी मिरज-पंढरपूर- कुर्डुवाडी- बार्शी- उस्मानाबाद-लातूर या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामास सुरुवात केली. ३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या मार्गावर मिरज-लातूर, बीदर-कोल्हापूर, मिरज-परळी पॅसेजर, निझामाबाद-पंढरपूर पॅसेजर या गाड्या धावतात. गर्दी व प्रवाशांच्या मागणीचा विचार करता भविष्यात या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

मिरज-पंढरपूरची विद्युत चाचणी यशस्वीमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मिरज-पंढरपूर या १३२ किलोमीटर रेल्वेमार्गावर विद्युत चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. डिझेल इंजीनने मिरज-पंढरपूर प्रवासासाठी दोन तास लागतात मात्र विजेवर चालणारी रेल्वे गाडी सव्वातासात पंढरपूरला पोहोचली. 

तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणारमध्य रेल्वेच्या पुणे विभागात मिरज-कोल्हापूर या ४८ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. सोलापूर विभागात मिरज-कुर्डुवाडी रेल्वेमार्गावर पंढरपूरपर्यंत एकेरीमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या या विद्युत चाचणीमुळे कोल्हापूर-मिरज-पंढरपूर या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या नियमित सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूर या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. या कामामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. - शैलेश गुप्ता, विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेmiraj-acमिरजlaturलातूरOsmanabadउस्मानाबाद