शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

माेठी बातमी; सोलापुरातील एलसीबीच्या पथकावर दगडफेक; तीन पोलीस कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:21 IST

बारलोणी (ता. माढा) येथील घटना; पोलिसांची सरकारी गाडीही फोडली

कुर्डूवाडी -  सांगोला येथील एका गुन्ह्याच्या घटनेतील संशियत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकावर बारलोनी (ता.माढा) येथे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान संशियताकडून दगडफेक करीत हल्ला झाला असून त्यात गुन्हे शाखेचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.   सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पोलिस शिपाई धनराज गायकवाड व चालक पोलिस शिपाई समीर शेख यांचे पथक सकाळी बारलोनी गावच्या हद्दीत तपासाच्या दिशेने पोहचले होते. तिथे पथक आल्याचे पाहून संबधीत आरोपींनी त्यांच्या सरकारी पोलीस गाडीवर हल्ला चढवित दगडफेक सुरू केली.

यात त्यांच्या दगडफेकित पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हल्ला झाला तरी कुर्डूवाडी पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नव्हता. वरिष्ठांकडून कळल्यानंतर येथील पोलिसांनी धावपळ सुरू केली.तोपर्यंतसोलापूर ग्रामीण पोलिसांचे अधिकची पथके पुढील कारवाईसाठी बारलोनी गावात दाखल झाली आहेत.  घटनास्थळी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस