शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Good News; आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात २१ हजार ५९१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:18 PM

७० टक्के रिकव्हरी; चोवीस तासात ५५७ पॉझिटिव्ह १२ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार ५0 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेतशहरात ७७ हजार २९७ तर ग्रामीणमध्ये १ लाख ७० हजार ७५३ चाचण्यांचा समावेश ३० हजार ७८७ जण पॉझिटिव्ह आले असून हे प्रमाण १२.४१ टक्के इतके आहे

सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ३० हजार ७८७ रुग्णांपैकी २१ हजार ५९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्तर टक्के असून अद्याप ८ हजार १०३ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात ५५७ जण पॉझिटिव्ह तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ५२३ अहवालात ५४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ११७ इतकी झाली आहे. आदित्यनगरातील ३८ वर्षांचा तरुण व मजरेवाडीतील ताकमोगे वस्तीतील एका ७३ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ४६५ इतकी झाली आहे. चोवीस तासात ३0 जण कोरोनामुक्त झाले असून, आत्तापर्यंतची संख्या ६ हजार ६६१ इतकी आहे. अद्याप ९९१ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २ हजार ६६ अहवालात ५०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ६७0 इतकी झाली आहे. चोवीस तासात ३३५ तर आत्तापर्यंत १४ हजार ९३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीणमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील ७६ वर्षांचे आजोबा,वाघोलीतील (ता.मोहोळ) ६७ वर्षांची व्यक्ती व भांबेवाडीतील ६0 वर्षांची महिला, दोड्डी (ता.दक्षिण सोलापूर) येथील ८६ वर्षांची वृद्धा,अकलूज (माळशिरस) येथील ६३ वर्षांची व्यक्ती, निमगाव येथील ७३ वर्षांचे आजोबा, भोसेतील (मंगळवेढा) ६0 वर्षांची महिला आणि बार्शीतील सोलापूर रोडवर राहणारे ७८ वर्षीय व उपळे (दु) येथील ७५ वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे. अशाप्रकारे ग्रामीणमधील मरण पावलेल्यांची संख्या ६२८ इतकी झाली आहे.

      २ लाख ४८ हजार चाचण्याजिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार ५0 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शहरात ७७ हजार २९७ तर ग्रामीणमध्ये १ लाख ७० हजार ७५३ चाचण्यांचा समावेश आहे. यात ३० हजार ७८७ जण पॉझिटिव्ह आले असून हे प्रमाण १२.४१ टक्के इतके आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय