शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Good News; एकाच वेळी 45 मालट्रक्स घेऊन जाणारी रेल्वेची 'रो-रो' सेवा आता सोलापुरातही !

By appasaheb.patil | Updated: April 4, 2020 15:43 IST

चाचणीस रेल्वे मंत्रालयाची मान्यता; ६८८ किमीचा टप्पा, उद्योजक, शेतकºयांसाठी वाहतुक सुविधा उपलब्ध होणार

ठळक मुद्देरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अभिनव संकल्पनेतील ही योजनारेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवेने माल वाहतूक करणाºया ट्रक व्यवसायिकांची वेळ, इंधनाची बचत होतेयूरोप व प्रगत राष्ट्रांमध्ये प्रचलित असलेली रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवा आपल्या सोलापुरातून

सोलापूर :  बेंगलुरू येथे आवश्यक वस्तूंच्या वेगाने वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे बोर्डाने गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील बाळे आणि बेंगलुरूमधील नेलमंगला दरम्यान रोल-आॅन-रोल आॅफ (रो-रो) सेवा सुरू करण्यासाठीच्या चाचणीस मान्यता दिली आहे़ या सेवेमुळे सोलापुर जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतका-यासाठी जलद आणि सुरक्षित  वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील उद्योगाला अधिक चालना मिळणार असल्याची  माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शेलेंद्र गुप्ता यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकाच्या यादीत सोलापूरचा समावेश होतो़ दरम्यान, सोलापुर शहर हे अनेक महामार्ग व रेल्वेच्या प्रमुख मार्गाला जोडलेले एक शहर आहे़ सोलापूरातील कांदा, फळ, पाले-भाज्या, साखर, चादरी, वस्त्रोद्योगातील व इतर शेती मालाला भारतात चांगली मागणी आहे. या मालाची ने आन सोपी व कमी खर्चात व्हावी यासाठी सोलापुर ते बंगळूरु ह्या ६८० किमीच्या टप्प्यात रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवा सुरू  करण्यासाठीमागील कित्येक वर्षापासून उदयशंकर पाटील यांनी मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता़ याकामी सोलापूर विभागातील अधिकाºयांनीही सातत्याने हा प्रकल्प सोलापुरात आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयातील मंत्र्यांसह अधिकाºयांशी संपर्क ठेवला होता़ अखेर मोठया प्रयत्नानंतर रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे विभागातील पहिल्या रो रो सेवेला मान्यता दिली.

काय आहे रेल्वे मंत्रालयाची रो-रो सेवा...मध्य रेल्वे विभागात ही सेवा प्रथमच चालविली येत आहे. दोन पॉईंट्स दरम्यान ६८२ कि.मी.चे अंतर आहे. यामुळे डिझेलची बचत होते़ ही पर्यावरणपूरक सेवा आहे. कमी वेळेत एकत्र ट्रक घेवून जात असल्यामुळे अधिक सुरक्षितपणा येतो़  ही रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे या तीन रेल्वे झोनमधून धावणार आहे़  प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागतील आणि ती वाडी व धर्मावरममार्गे धावणार आहे़  या मालगाडीत ४३ खुल्या वॅगन आहेत पण त्या गाडीच्या आकारानुसार ४३ हून अधिक ट्रक किंवा लॉरी घेऊन जाऊ शकतात. प्रति ट्रक ३० टन माल वाहतुकीस परवानगी आहे. प्रती ट्रक प्रती टन २ हजार ७०० रुपये भाडे म्हणून त्यावर शुल्क आकारले जाते.  ड्रायव्हर आणि दुसरा एखादी व्यक्ती ट्रकच्या सोबत जाऊ शकते आणि त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकिटे खरेदी करावी लागतात.  कोकण रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड (केआरसीएल) ही रो-रो सेवा सुरत्कल आणि कोलाड (मुंबईपासून १४३ किमी) दरम्यान काही वर्षांपासून चालू आहे.  प्रत्येक वाहतुकी (ट्रिप) साठी चार लाख रुपये देऊन केआरसीएलकडून भाडेतत्त्वावर एक रेक घेत आहे.रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अभिनव संकल्पनेतील ही योजना आहे़ देशातील उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ही रो-रो सेवा सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस होता़ या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि शेतका-यासाठी जलद आणि सुरक्षित  वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील उद्योगाला अधिक चालना मिळणार आहे़- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूररेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवेने माल वाहतूक करणाºया ट्रक व्यवसायिकांची वेळ, इंधनाची बचत होते व प्रदुषण टाळता येते तसेच अपघाताची संख्याही कमी होऊ शकते़ यूरोप व प्रगत राष्ट्रांमध्ये प्रचलित असलेली रेल्वेची रोल आॅन - रोल आॅफ सेवा आपल्या सोलापुरातून सुरु व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो. मागील दोन वर्षाच्या निरंतर प्रयासानंतर रेल्वे मंत्रालयाने भारतातील पहिल्या खाजगी रोल आॅन - रोल आॅफच्या आमच्या प्रस्तावास मान्यता दिली.उदयशंकर पाटील,उद्योजक, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे