शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Good News; आता सोलापुरातील मंगल कार्यालये, लॉन्स सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 09:20 IST

सेतू कार्यालय, महा ई सेवा केंद्र सुरू होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

ठळक मुद्देमंगल कार्यालयांना अटी व शर्तीवर सुरु करण्यास लवकरच मिळणार परवानगीजिल्हा प्रशासनाने सांगली येथील मंगल कार्यालय धारकांची नियमावली मागवलीप्रतिबंधित क्षेत्रातील मंगल कार्यालयांना मिळणार नाही परवानगी

सोलापूर : जिल्हयातील सेतू व महा ई सेवा केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी परवानी दिली आहे. तसेच लवकरच मंगल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर १३ मार्च रोजी साथरोग कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. साथीचा संसर्ग वाढू नये म्हणून सेतू कार्यालय व महा ई सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या ३0 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला असला तरी साथीच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करून विविध व्यवसाय व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकांना विविध दाखले व इतर गोष्टींसाठी सेतू कार्यालय व महा ई सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत होती. याचा विचार करून १४ अटी व शर्तीचे पालन करून सेतू कार्यालय व ई सेवा केंद्र उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने फिजीकल डिस्टन्स, गर्दी होऊ न देणे, प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्ॅकनिंग, नोंदवही, सॅनीटायझर, हात धुण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आजारी व्यक्तींनी प्रवेश करू नये असे फलक लावणे, शिबीर घेऊ नयेत ही बंधने असणार आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रातील केंद्रांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगल कार्यालय सुरू करण्यास परवानगी देता येईल काय याची चाचपणी सुरू आहे. निवासी उप जिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी मंगल कार्यालये सुरू झालेल्या सांगली व इतर जिल्ह्यातील नियमावली मागविली आहे. मंगल कार्यालयानाही लवकरच अटी व शर्तीवर परवाने देण्याचा प्रस्ताव आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय