शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Good News; मंगळवेढा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर; तीन कोव्हिड सेंटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 10:56 IST

८ हजार ७४२  कोरोना रुग्ण सापडले ; ८ हजार ५३८ जणांना जीवदान

 

 

 

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यासह तालुक्यात  अक्षरशः हाहाकार माजवला होता. अनेक लोकांना आपल्या आप्तेष्ठांना गमवावे लागले होते. मात्र आता ही लाट वेगाने ओसरत चालली आहे. अशात मंगळवेढा तालुक्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. २ लाख ५  हजार लोकसंख्या असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात आता केवळ २९ रुग्णसंख्या आहे 

 तालुक्यात तब्बल ६२ गावं कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात १७ गाव कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेला धीर मिळाला आहे.   तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडीत करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे . यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. .कोरोनाने दुसऱ्या लाटेत  जिल्ह्यात थैमान घातले होते . त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू केले.

मंगळवेढा तालुक्यात प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, बीडीओ सुप्रिया चव्हाण, डॉ नंदकुमार शिंदे,वैद्यकीय अधिकारी प्रमोद शिंदे ,डॉ धनंजय सरोदे ,डॉ दत्तात्रय शिंदे ,डॉक्टर संजय कांबळे, डॉ वर्षा पवार ,डॉ भीमराव पडवळे ,डॉ श्रीपाद माने  , फार्मसी ऑफीसर सी .वाय .बिराजदार ,हणमंतराव कलादगी, विस्ताराधिकारी प्रदीपकुमार भोसले  यांच्या सह तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक , तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी  याची कडक अंमलबजावणी केली. पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा देत येथील आरोग्य विभागही जिवाची बाजी लावताना दिसत आहे.

या कठिण परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, बोराळे, मरवडे , आंधळगाव, सलगर, भोसे, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. वाडीवस्तीवरील घरोघरो जावून विविध उपाययोजना राबवत जनसामान्यांत जनजागृती केली आहे. गावागावातील प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा पहिला डोस कसा देता येईल याचे योग्य नियोजन करत पहिल्या टप्यातील लसीकरण पूर्ण केले आहे.सध्या गावोगावी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी करत ग्रामस्तरीय दक्षता समितीसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विलगीकरण कक्षातील कोरोना बाधितांवर वेळोवेळी औषधोपचार करत गावोगावी राबवलेल्या इतर उपाययोजनामुळे कोरोनाची संक्रमण साखळी खंडित झाली आहे. आज संपूर्ण तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा---

तालुक्याची लोकसंख्या २ लाख ५ हजार २१४ जणांपैकी ८२ हजार ८०९ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८ हजार ७४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात ३ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे  ८ हजार ३५८ जणांना जीवदान मिळाले. या कोविड सेंटरमुळे नागरिकांचा सुमारे  कोट्यावधी चा वैद्यकीय खर्च वाचला असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.प्रशासनाने २१ हजार ६७२ नागरिकांचे लसीकरण केले आहे. १५ जूनपासून तीनही कोविड सेंटर बंद झाली आहेत. मंगळवार दि १५ जून रोजी ग्रामीण रुग्णालयसह पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या २३५ अँटिजेंन चाचणीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही त्यामुळे सध्याची आकडेवारी पाहता  जून महिना अखेर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरणार आहे.

 

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या