शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Good News; कोरोनामुक्त झालेल्या सोलापूरकरांची प्रकृती आहे उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:17 IST

Solapur Corona News पोस्ट कोविड ओपीडी; आतापर्यंत फक्त चौघांवर उपचार

ठळक मुद्देपोस्ट कोविड ओपीडी सुरू करुन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे या एका महिन्यात चार जण उपचारासाठी आले होतेसोलापुरात कोरोनानंतर त्रास होणाºया रुग्णांची संख्या तशी नगण्य

सोलापूर : कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना इतर त्रासाला सामोरे जावे लागते. पुणे, मुंबई येथे अशा रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र  सोलापूरकरांसाठी चांगली बाब म्हणजे सोलापुरात पोस्ट कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होणे, काही महिने श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुस व किडनीचे आजार, हृदयरोग अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील शासकीय रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचे आदेश दिले होते. सोलापुरातही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ११ सप्टेंबर रोजी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली. ही ओपीडी सोमवार, बुधवार, शुक्रवारी दुपारी तीन ते पाच दरम्यान सुरू असते.

एकूण रुग्णांपैकी दोन ते तीन टक्के कोरोनानंतर अशक्तपणा जाणवतो. तसेच  उपचार करत असताना ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावलेले असते त्यांच्या फुफ्फुसावर सूज येऊ शकते. एक चांगली बाब म्हणजे अशा प्रकारचे रुग्ण सोलापुरात खूपच कमी आहेत. शासनाच्या सूचनेनुसार पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. येथे औषधोपचारासोबतच योगासन, प्राणायाम, फुफ्फुसाचे व्यायाम याबाबत सांगण्यात येते. याचा व्यक्तीवर चांगला परिणाम होतो, असे डॉ. लतिफ शेख यांनी सांगितले.

कोविड कवच अ‍ॅप...कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आरोग्य समस्या येऊ शकतात. या परिस्थितीत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोविड कवच अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोनामुक्त व्यक्ती आपल्या समस्या मांडून तज्ज्ञातर्फे सल्ला घेऊ शकतात. अ‍ॅपमधून शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ एसएमएसद्वारे मार्गदर्शन करतील. यासाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे.

पोस्ट कोविड ओपीडी सुरू करुन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात चार जण उपचारासाठी आले होते. त्यापैकी दोघांना क्षयरोगाचा त्रास होता. या दोन रुग्णांना औषधे देऊन काही व्यायाम करायला सांगितले. सोलापुरात कोरोनानंतर त्रास होणाºया रुग्णांची संख्या तशी नगण्य आहे.- डॉ. लतिफ शेख, पोस्ट कोविड ओपीडी, शासकीय रुग्णालय, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल