शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Good News; अखेर अतिवृष्टीचा मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 19:16 IST

मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २०  कोटी जमा; मोबाईल वर मेसेज बघून शेतकरी आनंदीत

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा व्हावा यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिवाळी सुट्टी रद्द केल्या .मात्र बँकांच्या सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे अडकून पडलेला निधी अखेर मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील तब्बल ३६ हजार शेतकऱ्यांना १९ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. मंगळवारी पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे मेसेज मोबाईलवर पाहून शेतकरी आनंदित होत आहेत.

मंगळवेढा तालुक्यात भिमा नदीला आलेला महापूर व झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी  १९ कोटी ९८ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले.  हे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया  वेगाने केली या दरम्यान तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलचे  कर्मचारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले मात्र सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने हा निधी असुनही   शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

ऑक्टोबर महिन्यात दि. १३ ते २० या दरम्यान भिमा नदीला महापूर आला होता. अतिवृष्टी व महापूराने भीमा व माण नदीकाठसह तालुक्यातील ८१ गावातील विविध पिकांना मोठा फटका बसला होता. काळया शिवारात रब्बी ज्वारी, हरभरा, सुर्यफूल, तुरी, कांदा, कडधान्य यासह ऊस , फळपिके यांचे अतीवृष्टी झाल्याने  नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने  पाहणी करून नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनास सादर केला होता.यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा  महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे३४ कोटी ७६ लाख ७९ हजार ८२२ ची गरज असल्याचे कळविले होते. मात्र प्रत्यक्षात २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले होते .या आकडेवारीनूसार प्रति हेक्टर जिरायत बागायत दहा हजार रुपये तर फळबागांसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीत मदत निधी मिळावा यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तलाठी , मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ८१ गावातील ३६ हजार  शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आला आहे .मंगळवारपासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे- स्वप्निल रावडे, तहसीलदार मंगळवेढा

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा ठरवून शेतकऱ्यांना दिलासा दिला . आज माझ्या बँक खात्यात रक्कम जमा झाली.गतवर्षी ही महापुराने भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या  नुकसानीचे पंचनामे केले मात्र मदत मिळाली नाही तरी गतवर्षीच्या  मदत निधीचे अशाप्रकारे लवकर वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा- माणिकबाबा पाटील, शेतकरी ब्रह्मपुरी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर