शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील याठिकाणी मिळेल आयुषमान योजनेचे गोल्डन कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:03 IST

मनपाच्या १२ आरोग्य केंद्रांत काम सुरू; पाच लाखांपर्यंत मोफत उपचार, ‘पीएमओ’कडून पत्र आलेल्यांना लाभ

ठळक मुद्देआयुषमान योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार २०११ मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी ज्यांचे नाव यादीत आले त्यांनाच पंतप्रधान कार्यालयाकडून पत्रे आली आहेतपंतप्रधान कार्यालयाकडून पत्र प्राप्त झालेल्या नागरिकांनी जवळच्या मनपा आरोग्य केंद्रात संपर्क करावा

सोलापूर : केंद्र शासनाच्या आयुषमान भारत योजनेत पात्र ठरलेल्या नागरिकांना गोल्डन कार्ड देण्यासाठी महापालिकेने १२ केंद्रे सुरू केली आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आलेल्या नागरिकांनी या केंद्रांत जाऊन कार्ड काढावे, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले केले. 

डॉ. नवले म्हणाले, आयुषमान योजनेचे शहरात ५८ हजार लाभार्थी आहेत. यापैकी १८ हजार लाभार्थ्यांकडे गोल्डन कार्ड होते. उर्वरित लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी मनपाच्या शेळगी, मजरेवाडी, सोरेगाव, बाळे, रामवाडी, अक्कलकोट रोड मुद्रा सन सिटी, विडी घरकूल, दाराशा, भावनाऋषी, डफरीन चौक या आरोग्य केंद्रांत सोय करण्यात आली आहे. महापालिका केवळ ३० रुपयांत कार्ड काढून देत आहे. लाभार्थ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आले असेल हे पत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे घेऊन नागरिकांनी या केंद्रामध्ये जावे. महिनाभरात सर्वच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, असेही डॉ. नवले यांनी सांगितले.

आयुक्त घेताहेत नियमित आढावा- आयुषमान भारत योजनेतील कार्ड काढण्याच्या मोहिमेचा मनपा आयुक्त दीपक तावरे हे नियमितपणे आढावा घेत आहेत़ आयुक्तांनी बुधवारी रामवाडी, सोरेगाव, मजरेवाडी, नई जिंदगी, चाकोते हॉस्पिटल या ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केली होती. आशा वर्करच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

आयुषमान योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यासाठी २०११ मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी ज्यांचे नाव यादीत आले त्यांनाच पंतप्रधान कार्यालयाकडून पत्रे आली आहेत. यातील काही लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र प्राप्त झालेल्या नागरिकांनी जवळच्या मनपा आरोग्य केंद्रात संपर्क करावा.-डॉ. संतोष नवले, आरोग्य अधिकारी, मनपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयayushman bharatआयुष्मान भारत