शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'चिल्लाएगी तो मार डालुंगा', असे म्हणून घरातील सोने पळविले; गादेगाव येथे दोन चोरांनी घातला दरोडा

By appasaheb.patil | Updated: September 25, 2023 10:01 IST

सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल पळविला

पंढरपूर : नरड्याला चाकु लावून चुपचाप सो जा, हम दो लोगो का खून करके आये है, चिल्लाएगी तो मार डालुंगा, तुम्हारे पास क्या है वो दे दो, और चादर ओढ के सो जा, अशी धमकी गादेगाव (ता. पंढरपूर) येथील घरात एकटी असलेल्या महिलेला देऊन दोन चोरांनी ३४ ग्रॅम सोने, अंदाजे अडीज भार चांदीचे दागिणे, ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ४० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेहल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उषा सोमनाथ बागल (वय २९, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यांच्या घरातील सर्वजण बाहेर गेल्याने २३ सप्टेंबर (शनिवारी) त्या घरात एकट्याच होत्या. एकटीच असल्याने दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेल्या होत्या. रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना कपाट उघडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्या जागी झाल्या.  तेव्हा त्यांनी घरातील लाईटच्या प्रकाशात पाहिले असता त्यांना समोर दोन इसम उभे दिसले.

उषा यांनी आरओरडा केल्यानंतर त्या इसमाने उषा यांच्या नरड्याजवळ चाकु धरुन चुपचाप सो जा, हम दो लोगो का खून करके आये, है, चिल्लाएगी तो मार डालुंगा, चादर ओढ के सो जा, असे म्हणून धमकी दिल्याने उषाा झोपी गेल्या. त्यांनी कपाटातील दागिणे व रोख रक्कम काढल्यानंतर उषा जवळ आले. तुम्हारे पास क्या है वो दे दो असे म्हणताच भितीपोटी उषा यांनी कानातील रिंगा व गळ्यातील मंगळसुत्र त्यांना देऊन टाकले. यानंतर ते गेले. या चोरी दरम्यान उषा यांच्या घरातील मिनिगंठण, अंगठी, कानातील रिंगा, मंगळसुत्र असे ३४ ग्रॅम सोने, अंदाजे अडीज भार चांदीचे दागिणे, ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी पळवून नेहली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी भेट दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीPandharpurपंढरपूर