शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाखरीत बिबट्याकडून शेळ्यांची शिकार; आरडाओरडा करताच फरार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:53 IST

गार्डी अन् भाळवणीत मुक्काम : शिवारात शाळकरी मुलीने पाहिला थरार

ठळक मुद्देबिबट्याच्या उच्छादामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेजिल्ह्याच्या सीमेवर आलेला हा हिंस्त्र प्राणी आता पंढरपूर तालुक्यातील गावात घुसलाजिल्ह्यात ऊस शेती आणि पाण्याची मुबलकता असल्यामुळेच बिबट्या इकडे वावरत असल्याचे तज्ज्ञांचे मत

पंढरपूर : गेल्या २५ दिवसांपासून वाखरी येथे मुक्काम करीत असलेल्या बिबट्याने आता त्याचा मुक्काम बदलला असून तो भाळवणी येथे पोहोचला आहे.

वाखरी ( ता. पंढरपूर) येथील लक्ष्मणदास महाराज माथा जवळील विकास गायकवाड यांच्या शेतामध्ये बिबट्या अनेक दिवसांपासून वावरत होता. यामुळे विकास गायकवाड यांची शेतातील कामे अपूर्ण राहिली़ बिबट्याचा वावर असल्याने भीतीपोटी त्यांनी यंत्राद्वारे उसाची तोडणी केली. यामुळे त्या परिसरातून बिबट्याने आपला मुक्काम वाखरीतच मात्र राऊत वस्तीकडे केला होता. त्या परिसरात माणसांचा जादा वावर असल्याने बिबट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भाळवणीत शेळ्यांची शिकार केली, परंतु पुन्हा गुरुवारी रात्री गार्डी येथे शेळीची शिकार केली आहे. 

याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पोवळे यांनी तत्काळ त्या ठिकाणी कर्मचाºयांना पाठवून संबंधित घटनेचा पंचनामा केला. तसेच गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी देखील भाळवणी गावाला भेट देऊन वन विभागाच्या कर्मचाºयांना  सूचना दिल्या आहेत.

तसेच भाळवणी येथे एका कुत्र्यावर बिबट्या हल्ला करताना शाळकरी मुलीने पाहिले आहे. मुलीने तत्काळ आरडाओरडा करताच बिबट्या पुन्हा शेतामध्ये निघून गेला. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाºयांनादेखील नेमके कोणत्या गावात कोणत्या ठिकाणी कार्यवाही करावी याचा अंदाज येईनासा झाला आहे.

ग्रामस्थांमध्ये भीतीबिबट्याच्या उच्छादामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून, जिल्ह्याच्या सीमेवर आलेला हा हिंस्त्र प्राणी आता पंढरपूर तालुक्यातील गावात घुसला आहे. त्यामुळे ग्रामस्थ खबरदारी बाळगूनच रात्री उशीरा बाहेर पडतात. बिबट्या दिसला तर काय करावे, याबाबत वनविभागाने वाखरी येथे बैठक घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले असले तरी त्यांच्यामधील भीती कायम आहे. जिल्ह्यात ऊस शेती आणि पाण्याची मुबलकता असल्यामुळेच बिबट्या इकडे वावरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरTigerवाघ