शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसासमक्ष मुलीने दुसºया मजल्यावरून मारली उडी; वडिलांनी घेतला फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:39 IST

वडिल व मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; पिता-पुत्रीवर सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर : कौटुंबिक वादातून मुलीने दुसºया मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही माहिती कळताच मुलीच्या वडिलांनी बेडरुममध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना पोलिसांच्या समक्ष घडल्या. यामुळे मुलगी व वडिलांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़  याबाबत हवालदार भाऊसाहेब कृष्णात दळवे (नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हवालदार भाऊसाहेब दळवे ड्युटीवर असताना गुरुवारी रात्री त्यांना गेंट्याल टॉकिजजवळ रुक्मिणी कॉम्प्लेक्स येथील दुसºया मजल्यावर घरगुती भांडण सुरू असल्याची माहिती कळाली़. त्या माहितीवरून दळवे हे तेथे पोहोचले़  तेव्हा तेथे कविता विटकर व आरती विटकर या दोघांमध्ये भांडण सुरू होते़. त्यावेळी विठ्ठल विटकर हे तेथेच उपस्थित होते़. त्यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते़ यामुळे दळवे यांनी विठ्ठल यांना दवाखान्यात उपचारासाठी जाण्यास समजावून सांगत असताना आरोपी आरती विठ्ठल विटकर (वय २३, रा़ रुक्मिणी कॉम्प्लेक्स, गेंट्याल टॉकिज) हिने राहत्या घराच्या दुसºया मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला़. त्यात आरती हिला डोक्यास व उजव्या पायास गंभीर जखम झाली़. यामुळे तिला उपचारासाठी दळवे व आरतीच्या भावाने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले़. दरम्यान, वडील विठ्ठल चन्नाप्पा विटकर (वय ५३, रा़. रुक्मिणी कॉम्प्लेक्स) यांनी घरात बेडरुमचे आतून दार लावून घेऊन गळफास घेण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी दरवाजा तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला आणि विठ्ठल यांच्या गळ्याची फास काढत त्यांना हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत दाखल केले़. यामुळे आरोपी विठ्ठल विटकर व आरोपी आरती विठ्ठल विटकर यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़. घटनेचा तपास पोलीस सहायक इन्स्पेक्टर शेख हे करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस