कुसळंब (ता़ बार्शी, जि़सोलापूर) : पाणी उपसताना विहिरीत पडलेल्या आईला वाचविण्याच्या प्रयत्नांत मुलीचाही बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारी (ता. बार्शी) शिवारातील अशोक करळे यांच्या शेतात ही दुर्घटना घडली.आशाबाई तात्यासाहेब कदम (४०) व पूजा (१५) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. पिण्याचे पाणी आणण्यासाठी आशाबाई शेतात गेल्या होत्या. विहिरीस उतरणीचा मार्ग असल्याने पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. हे पाहताच पूजा आईला वाचविण्यासाठी गेली. मात्र पोहता येत नसल्याने दोघीही पाण्यात बुडाल्या. पूजा नववीत शिकत होती.
आईसह मुलीचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 04:02 IST