आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपुर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार जणांना भाजले ,दोन घरांची पडझड झाली़ या घटनेत दहा लाखाची हानी झाली. ही घटना मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली. बहिरगोंडे यांच्या शेतातील वस्तीत राहणाºया दोन कुटुंबाचा संसार या घटनेने उघड्यावर आला आहे. रात्री झोपताना हलगर्जीपणा पणाने सिलेंडरचे रेग्युलेटर चालूच राहिल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्रीनंतरअचानक स्फोट झाला, पत्र्याच्या खोलीत झोलेले सर्वजण बाहेर आले तरीही अंबु अप्पासाहेब सुतार ,राजश्री सातप्पा बहिरगोंडे, अप्पासाहेब सुतार , विठ्ठल यालगोंडा कांबळे यांना काहीसे भाजल्याने ते जखमी झाले. जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात आगीच्या ठिणग्या पडल्या, कडब्याच्या गंजीलाही झळ पोहोचली, पत्र्याचे घर,त्यातील धान्य, समान सुमान भांडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे १० लाखाची हानी झाली.
सादेपुरात गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जण जखमी, दहा लाखाची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:50 IST
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपुर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार जणांना भाजले ,दोन घरांची पडझड झाली़ या घटनेत दहा लाखाची हानी झाली
सादेपुरात गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जण जखमी, दहा लाखाची हानी
ठळक मुद्दे बहिरगोंडे यांच्या शेतातील वस्तीत राहणाºया दोन कुटुंबाचा संसार या घटनेने उघड्यावर आलासिलेंडरचे रेग्युलेटर चालूच राहिल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आलेपत्र्याचे घर,त्यातील धान्य, समान सुमान भांडी आगीच्या भक्ष्यस्थानी