शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विठ्ठलवाडीत गॅसचा स्फोट; युवकांच्या धाडसामुळे धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:34 IST

सांगोला : वेळ आली होती परंतू काळ आला नव्हता, अशीच भयंकर घटना सोमवारी दु. १ च्या सुमारास महूद-विठ्ठलवाडी (ता. सांगोला) येथे घडली़ पितृपक्षानिमित्त घरात महिला म्हाळाचा स्वयंपाक बनवत असताना अचानक गॅसचा भडका होवून सिलेंडरने पेट घेतला. यावेळी महिला आरडाओरड करताच दोन युवक धाडसाने घरात प्रवेश करीत महिलांना दुसºया दवाज्यातून बाहेर ...

ठळक मुद्देदोन युवक धाडसाने घरात प्रवेश करीत महिलांना दुसºया दवाज्यातून बाहेर काढले़पेटलेला सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने नियंत्रण मिळविलेसुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

सांगोला : वेळ आली होती परंतू काळ आला नव्हता, अशीच भयंकर घटना सोमवारी दु. १ च्या सुमारास महूद-विठ्ठलवाडी (ता. सांगोला) येथे घडली़ पितृपक्षानिमित्त घरात महिला म्हाळाचा स्वयंपाक बनवत असताना अचानक गॅसचा भडका होवून सिलेंडरने पेट घेतला. यावेळी महिला आरडाओरड करताच दोन युवक धाडसाने घरात प्रवेश करीत महिलांना दुसºया दवाज्यातून बाहेर काढले़ त्यानंतर पेटलेला सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गॅसची शेगडी, खिडक्याचे तावदाने, स्लॅब क्रॅक व फरशा फुटून मोठे नुकसान झाले आहे.  

महूद (विठ्ठलवाडी) येथील सुभाष गोटे यांचे वडील शिवैक्य गिरीधर गोटे यांच्या पितृपक्षानिमित्त म्हाळाचा स्वयंपाक प्रिती गोटे, पूजा गोटे, ललिता गोटे या बनवीत होत्या. यावेळी सासू कमल गोटे बाजूला बसल्या होत्या. स्वयंपाक चालू असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती होवून भडका उडाला आणि गॅसने पेट घेतला़ अचानक महिलांनी आरडाओरड सुरु केली.

यावेळी गर्दीतून सोमनाथ वाघमारे व तोसीम मुलाणी या दोघांनी धाडस करुन घरात प्रवेश करीत महिलांना घराबाहेर काढले. त्या दोघांनीच पेटलेला सिलेंडर किचनमधून बाहेर काढून त्यावर पाण्याचा मार केला व पोत्याचा बारदाना टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात येत नव्हती. अखेर भारत गॅसचे वितरक सतीश धांडोरे यांच्याकडून अग्निशमन बंब आणून पेटलेल्या गॅस सिलेंडरवर नियंत्रण मिळविल्याने सर्वांच्या जीवात जीव आला. रात्री उशीरापर्यंत या घटनेविषयी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्रा