शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सोलापूरातील गारमेंट पार्क वर्षाअखेरपर्यत कार्यान्वित होणार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची आकाशवाणीवरील विशेष मुलाखतीत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:40 IST

आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. त्या मुलाखतीत डॉ. भोसले यांनी जिल्ह्याच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत भूमिका स्पष्ट केली

ठळक मुद्दे- तीर्थक्षेत्रांच्या विकासातून धार्मिक पर्यटनाला चालना-   उजनीतून पाणी आणण्याच्या योजनेचा पहिला टप्पा सप्टेंबर 2018 सुरू होईल.-  एक एप्रिलपासून आॅनलाईन फेरफार आणि सातबारा प्रकल्प सुरू होईल.-   विमानतळाच्या विकासाचा प्रश्न वर्ष अखेरपर्यंत मार्गी लागेल.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. २५ : सोलापुरातील वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी गारमेंट पार्क प्रकल्पाला चालना देणार असून डिसेंबर २०१८ पर्यंत गारमेंट पार्कचा प्रकल्प पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. त्या मुलाखतीत डॉ. भोसले यांनी जिल्ह्याच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत भूमिका स्पष्ट केली. सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी ही मुलाखत घेतली. उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आणि जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी मुलाखतीचे संयोजन केले.डॉ. भोसले म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सुमारे साठ हजार लोक विडी उद्योगात, साठ हजार लोक बांधकाम व्यवसायात आणि साठ हजार लोक यंत्रमाग उद्योगातील रोजगारावर अवलंबून आहेत. विडी उद्योगाला आता फार काही भविष्य नाही. या उद्योगातील लोकांना इतरत्र रोजगार मिळायला हवा यासाठी गारमेंट पार्क प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गारमेंट पार्कसाठी आवश्यक असणारी जागा, आवश्यक पायाभूत सुविधा यांबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. याबाबतच्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन डिसेंबर २०१८ पर्यंत गारमेंट पार्क अस्तित्वात येईल.सोलापूर जिल्हा आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र होऊ शकते. असा विश्वास श्री. भोसले यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथील विठ्ठल, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी देवी यांचे देशभरात भक्त आहेत. या क्षेत्रांचा नियोजनबध्द विकास करून धार्मिक पर्यटनाचे सर्किट करण्याचे आमचे धोरण आहे, असे श्री. भोसले यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यातून सोळा महामार्गांचे रूंदीकरण आणि चौपदरीकरण अतिशय गतीने सुरू आहे. या कामासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी येणार आहे. या निधीच्या माध्यमातून कामे झाल्यावर रस्त्यांच्या प्रकल्पामुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. जिल्ह्याला गेल्या वर्षीच्या कामाबाबत राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाला. यंदाही जलयुक्त शिवार अभियानातून सुमार १४ हजार कामे प्रस्तावित केली आहेत. ही सर्व कामे विहीत वेळेत पूर्ण होतील. आणि त्या त्या गावात शाश्वत पाणी साठा होईल असा विश्वास आहे, असे  भोसले यांनी सांगितले.सोलापूर विमानतळाच्या विस्तार आणि विकासाबाबत जिल्हा प्रशासन आग्रही आहे. विमानतळाच्या विकासात अडथळा ठरणाºया कारखान्याच्या चिमणी बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. डिसेंबर २०१८ पर्यंत याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होतील.सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत ते म्हणाले, उजनीतून पाणी आणण्यासाठी ३५० कोटी रूपयांची योजना आखली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू होईल त्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले...

-  सोळा रस्त्यांचे कामाचे भूसंपादन लवकरच पूर्ण करू.

-  मार्च २०१९ पर्यंत रस्ते विकासाचे काम पूर्ण होईल.

 

 

-  मेडिकल टूरिझमसाठी सोमी, सुविधा देणार.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय