शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील कचरा डेपोचे होणार ‘आॅडिट’, प्रक्रिया करण्यावर दिला भर, लवकरच प्रकल्प अहवाल तयार करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:25 IST

मनपाच्या अखत्यारित असलेल्या कचरा डेपोतील साठ्याची तपासणी करण्यात येत असून या कचºयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाणार आहे. 

ठळक मुद्दे- टाटा कन्सल्टन्सीमार्फत राज्यभर कचºयावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत- ड्रोन कॅमेºयाद्वारे तुळजापूर खतडेपोचे चित्रीकरण कचºयाचा साठा नेमका किती याचा अंदाज घेण्यास सुरुवात - मनपाच्या दोन साठ्यांबरोबर बाजार समितीमध्ये साठलेल्या कचºयाची पाहणी करण्यात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : मनपाच्या अखत्यारित असलेल्या कचरा डेपोतील साठ्याची तपासणी करण्यात येत असून या कचºयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाणार आहे. आरोग्य विभागातर्फे तुळजापूर रोडवर ५१ एकरात कचरा डेपो वसविण्यात आला आहे. तसेच भोगाव रोडवरही कचरा डेपो आहे. या ठिकाणी खोदून माती काढून कचºयाची साठवणूक करण्यात आली आहे. कचºयाचे मोठे ढिगारे तयार झाले असून डेपो भरत आला आहे. येथे ओल्या कचºयावर प्रक्रिया करून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्यापासून फक्त सुका कचरा साठविला जात आहे. तरीही कचºयाचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. भविष्यात कचरा डेपो कोठे करायचा, हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने मनपाने साठलेला हा कचरा खाणीत गाडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. टाटा कन्सल्टन्सीमार्फत राज्यभर कचºयावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या संस्थेचे प्रतिनिधी सोलापुरात दाखल झाले आहेत. यांनी ड्रोन कॅमेºयाद्वारे तुळजापूर खतडेपोचे चित्रीकरण कचºयाचा साठा नेमका किती याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. साठलेले ढिगारे व त्याचे क्षेत्र यावरून कचºयाच्या साठ्यांचा अंदाज घेतला जात आहे. याचबरोबर कचरा किती खोलीपर्यंत गाडला आहे, याचीही माहिती आरोग्य विभागाकडून घ्यावी, अशा सूचना उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील यांनी संस्थेच्या प्रतिनिधींना दिल्या. मनपाच्या दोन साठ्यांबरोबर बाजार समितीमध्ये साठलेल्या कचºयाची पाहणी करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या म्हणण्यानुसार तेथे सुमारे १२00 टन कचरा आहे. तिन्ही ठिकाणच्या कचºयाचे मोजमाप घेऊन प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प अहवाल केला जाणार आहे. याचा खर्च शासन करणार आहे. ------------------------कामगार युनियनचे निवेदन...- घंटागाडीवर ठेकेदारांमार्फत मजूर पुरविण्यास कामगार युनियनचा विरोध असल्याचे अशोक जानराव यांनी म्हटले आहे. उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची भेट घेऊन या प्रस्तावाबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कामगारांच्या देय रकमा व वेतन आयोगाचा फरक देण्याची घोषणा करून दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन महापौर शोभा बनशेट्टी यांना देण्यात आले.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका