शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात घटस्फोटित, विधवांच्या मुलांना मोफत इंग्रजी शिक्षण, शहरातील २० शाळांसाठी भरता येईल अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:09 IST

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआरटीई कोट्यासाठी १ ते २0 फेब्रुवारी या कालावधीत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणारआॅनलाईन अर्ज करण्यासाठी शिक्षण मंडळ व शाळांच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात येणारआॅनलाईन अर्ज भरताना पालकांना एकाचवेळी १0 शाळा निवडता येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच या शाळांमध्ये घटस्फोटित व न्यायप्रविष्ट प्रकरणातील महिला, विधवांची बालके व अनाथ मुलांनाही या जागेवर अर्ज करता येणार असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांनी दिली. आरटीई कोट्यासाठी १ ते २0 फेब्रुवारी या कालावधीत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शिक्षण मंडळ व शाळांच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी या कोट्यात शहरात ६४0 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४१९ जागा भरण्यात आल्या. यंदा जागा वाढण्याची शक्यता आहे. अद्याप शाळांची नोंदणी सुरू आहे. आॅनलाईन अर्ज भरताना पालकांना एकाचवेळी १0 शाळा निवडता येणार आहेत. आॅनलाईन प्रवेशाची सोडत तीन टप्प्यात होईल. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थी, दुसºया टप्प्यात १ ते ३ किलोमीटर परिसरातील विद्यार्थी आणि तिसºया टप्प्यात ३ किलोमीटरपेक्षा अधिक  अंतरातील विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. या कोट्यात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्राथमिकसाठी सन २0१५-१६ साठी १३ हजार २३0 इतकी फी निश्चित करण्यात आली होती तर सन २0१६-१७ साठी १७ हजार ६७0 इतकी फी निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा जादा फी शाळांना घेता येणार नाही.  या कोट्यासाठी शाळांनी आॅनलाईन नोंदणी २७ फेब्रुवारीपर्यंत करावयाची आहे. -------------------------या आहेत पात्र शाळा...- राज मेमोरियल स्कूल, केकडेनगर व जुनी मिल कंपाऊंड, नागेश करजगी आॅर्किड स्कूल, गांधी नाथा रंगजी, सहस्रार्जुन, व्हॅलेंटाईन, ज्ञानप्रबोधिनी, विद्या इंग्लिश, नवजीवन, पोलीस पब्लिक, सुरवसे इंग्लिश, श्री. सुशीलकुमार शिंदे स्कूल, इंडियन मॉडेल, मॉडेल पब्लिक, इंडिय मॉडेल सीबीएसई, युनिक इंग्लिश, बटरफ्लॉय, पद्मश्री रामसिंग भानावत इंग्लिश, गुड शेफर्ड व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. अडचणीबाबत पालकांनी कार्यालयातील पर्यवेक्षक सुरेश कासार, वरिष्ठ लिपिक प्रभावती कासार यांच्याशी संपर्क साधावा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका