शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:02 IST

समूह संक्रमणाचा धोका वाढला; नगरपरिषद व आरोग्य विभाग सज्ज

मंगळवेढा : मंगळवेढा तालुका प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ १० दिवसाच्या लॉकडाऊननंतर सुरू होऊन आठवडा झाला तरीही संपूर्ण शहरात विना मास्क नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही, परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे.  कोरोनाला आळा घालण्यासाठी बेफिकीर वागणाऱ्या नागरिकांवर प्रशासनानेच कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

शहरात कोरोनाचे तांडव सुरूच असून सोमवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत १० तर मंगळवारी ८ अशा १८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची शंभरी पार झाली आहे. एकूण बाधितांची संख्या १०४ वर पोहोचली आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखला जावा यासाठी  संपूर्ण मंगळवेढा शहर व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी १० दिवस संपूर्ण शहरच प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून  घोषित केले  होते, तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात १०६ जणांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात आली यामध्ये १०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर एकजण पॉझिटिव्ह आला. सोमवारी ग्रामीण रुग्णालय येथे स्वब घेऊन सोलापूर येथे तपासणीसाठी पाठवले होते  त्याचा मंगळवारी अहवाल आला असून यामध्ये सात ही व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच पोलीस कर्मचारी, एक कैदी व एक न्यायालयीन महिला कर्मचारी असे सात जण  पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे मंगळवारी रात्री आठ पर्यत मंगळवेढा तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या १०४ झाली आहे यामध्ये २१ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर ८२ रुग्ण उपचार घेत आहेत.  बळीची संख्या एक आहे.

रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे. प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठेत नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनी आपला दंडूका ताकदीने चालविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने लॉकडाऊन मोडणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात शहर व तालुक्यात समूह संक्रमण होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.-------------------------------मंगळवेढा तालुक्यात मंगळवारी रात्री पर्यत कोरोना बाधितांची संख्या १०४ आहे यामध्ये २१ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर ८२ रुग्ण उपचार घेत आहेत बळीची संख्या एक आहे  रुग्ण संख्येत वाढ होत असून नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे  आहे  - उदयसिंह भोसले, प्रांताधिकारी, मंगळवेढा 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूर