नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:01 PM2020-07-28T21:01:38+5:302020-07-28T21:02:04+5:30

समूह संक्रमणाचा धोका वाढला; नगरपरिषद व आरोग्य विभाग सज्ज

Free movement of citizens without masks; Hundreds of corona patients cross Mangalvedha taluka ...! | नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...!

नागरिकांचा विना मास्क मुक्तसंचार; मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार...!

Next

मंगळवेढा : मंगळवेढा तालुका प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ १० दिवसाच्या लॉकडाऊननंतर सुरू होऊन आठवडा झाला तरीही संपूर्ण शहरात विना मास्क नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही, परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे.  कोरोनाला आळा घालण्यासाठी बेफिकीर वागणाऱ्या नागरिकांवर प्रशासनानेच कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

शहरात कोरोनाचे तांडव सुरूच असून सोमवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत १० तर मंगळवारी ८ अशा १८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची शंभरी पार झाली आहे. एकूण बाधितांची संख्या १०४ वर पोहोचली आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखला जावा यासाठी  संपूर्ण मंगळवेढा शहर व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी १० दिवस संपूर्ण शहरच प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून  घोषित केले  होते, तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 


मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात १०६ जणांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात आली यामध्ये १०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर एकजण पॉझिटिव्ह आला. सोमवारी ग्रामीण रुग्णालय येथे स्वब घेऊन सोलापूर येथे तपासणीसाठी पाठवले होते  त्याचा मंगळवारी अहवाल आला असून यामध्ये सात ही व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच पोलीस कर्मचारी, एक कैदी व एक न्यायालयीन महिला कर्मचारी असे सात जण  पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे मंगळवारी रात्री आठ पर्यत मंगळवेढा तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या १०४ झाली आहे यामध्ये २१ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर ८२ रुग्ण उपचार घेत आहेत.  बळीची संख्या एक आहे.


रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे. प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठेत नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनी आपला दंडूका ताकदीने चालविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने लॉकडाऊन मोडणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात शहर व तालुक्यात समूह संक्रमण होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-------------------------------
मंगळवेढा तालुक्यात मंगळवारी रात्री पर्यत कोरोना बाधितांची संख्या १०४ आहे यामध्ये २१ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर ८२ रुग्ण उपचार घेत आहेत बळीची संख्या एक आहे  रुग्ण संख्येत वाढ होत असून नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे  आहे  
- उदयसिंह भोसले, प्रांताधिकारी, मंगळवेढा 

Web Title: Free movement of citizens without masks; Hundreds of corona patients cross Mangalvedha taluka ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.