शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मुक्त पक्षी बर्ड फ्लूपासून मुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST

करमाळा : देशी-विदेशी व स्थलांतरित पक्ष्यांचे ‘माहेरघर’ असणाऱ्या उजनी जलाशय परिसरात अद्यापपर्यंत एकही पक्षी बर्ड फ्लूने मरण ...

करमाळा : देशी-विदेशी व स्थलांतरित पक्ष्यांचे ‘माहेरघर’ असणाऱ्या उजनी जलाशय परिसरात अद्यापपर्यंत एकही पक्षी बर्ड फ्लूने मरण पावलेला नाही. उजनी जलाशयासाठी दिलासा देणारी ही बाब ठरली आहे.

उजनी जलाशयावर दरवर्षी असंख्य देशी पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित, विदेशी पक्षी हजेरी लावतात. यंदा उजनी जलाशय तुडुंब भरलेले असताना वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे काठावर पक्ष्यांची संख्या घटली आहे. कारण जलाशयातील पाणवठे, पाणथळ जागा, दलदलीचे ठिकाण अद्यापही पाण्याखालीच आहेत. अतिवृष्टीनंतर सर्व धरणे, तलावांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर उजनी लाभक्षेत्रात सतर्कता पाळत आहेत. याबाबत उजनी धरण लाभ क्षेत्रात पाहणी सुरू आहे. पशुसंवर्धन खात्यामार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे.

---

तालुक्यात चार अतिदक्षता पथके

तालुक्‍यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील पोल्ट्री फार्मची पाहणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. ते ग्रामस्थांच्या संपर्कातही आहेत. तालुक्‍यात चार अतिदक्षता पथके तयार करण्यात आली आहेत. अद्यापपर्यंत तरी तालुक्‍यात कुठे मृत पक्षी आढळून आलेले नाहीत. उजनी लाभक्षेत्रातील केत्तूर, वाशिंबे, उमरड येथील पशुवैद्यकीय अधिकारी याबाबत सतर्क आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

----

किलबिलाट कमी झाला

करमाळा तालुक्‍यातील कोंढार चिंचोली, कात्रज, डिकसळ, केत्तूर, गोयेगाव, वाशिंबे, सोगाव, कुगाव, टाकळी, कंदर, वांगी, कात्रज, चिकलठाण, गौळवाडी, खातगाव, पोमलवाडी, रामवाडीसह इंदापूर तालुक्‍यांतील डिकसळ, कुंभारगाव, पळसदेव, भादलवाडी, आगोती, गंगा वळण या उजनी लाभक्षेत्रातील गावांत पक्ष्यांचा किलबिलाट यावर्षी कमी झालेला दिसताेय. उजनीचे आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचेही आगमन अद्याप झालेले नाही.

---

पाणलोट क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची वर्दळ तुलनेने कमी आहे. मात्र, काही दिवसांत पाण्याचा विसर्ग होणार आहे; परिणामी पक्ष्यांची गर्दी होईल. त्यावेळी बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परिसरातील नागरिक व पर्यटकांनी सावधानता बाळगावी.

- डॉ. अरविंद कुंभार

पक्षी अभ्यासक

--

फोटो : १६ करमाळा बर्ड

संग्रहीत छायाचित्र