शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दस्ताद्वारे मालकाच्या परस्पर विकला तिऱ्हाईताला प्लॉट, साक्षीदारासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा 

By विलास जळकोटकर | Updated: August 19, 2023 22:07 IST

Solapur: मूळ मालकाला खबर न लागू देता बनावट दस्त तयार करुन जागेच्या मूळ मालकानेच आसरा चौक परिसरातील प्लॉट विक्रीला दिल्याचा बनाव केला. सन २००४ ते २०२० या दरम्यान ही घटना घडली आहे.

- विलास जळकोटकरसोलापूर - मूळ मालकाला खबर न लागू देता बनावट दस्त तयार करुन जागेच्या मूळ मालकानेच आसरा चौक परिसरातील प्लॉट विक्रीला दिल्याचा बनाव केला. सन २००४ ते २०२० या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी साक्षीदारासह तिघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी सज्जन विनायक कांबळे (वय ४९, रा. बुधवार पेठ, जय मल्हार चौक) यांनी किशोर चंडक यांच्याकडून ५ मार्च २००२ रोजी मंत्री चंडक इस्टेट मधील प्लॉट नंबर ११७ रितसर खरेदी केला हता. त्यानंतर हा प्लॉट यातील फिर्यादी यांनी कोणासही विक्री केला नाही. परंतु फिर्यादी यांनी खरेदी केल्याच्या १६ वर्षानंतर प्लॉटच्या फेर उताऱ्यावर संशयित व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यासाठी अनोंदणीकृत बनावट कागदपत्रे आरोपींकडून तयार करण्यात आली.

दरम्यान आरोपी इस्माईल याने बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीर व्यवहार करून यातील फिर्यादी सज्जन व शासनाची फसवणूक केली आहे. या व्यवहारास चंद्रकांत सिद्राम कांबळे व अब्बास अ.हमीद शेख हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक क्षिरसागर हे तपास करीत आहेत.

अशीही बनवाबनवीविशेष म्हणजे २००४ मध्ये यातील फिर्यादी सज्जन कांबळे यानेच आरोपी ईस्माईल ईब्राहिम शेख (रा. इंदिरा नगर, विजापूर रोड) यास खरेदी दिल्याचे या कागदपत्रात दाखविण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी ईस्माईल याने उताऱ्यावर स्वत:च्या नावाची नोंद करून घेऊन जहीर मुल्ला या व्यक्तीला तो प्लॉट विक्री केला. त्यानंतर जहीर मुल्ला यानेही महमद युसूफ याकुबअली उस्ताद यांना तो प्लॉट खरेदी दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर