शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसाठी सर्वच शेतकºयांना मताधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:22 IST

सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूकीसाठी मतदार यादी १५ मेपर्यंत तर निवडणूक १५ आॅगस्टपर्यंत घेण्याचा न्यायालयाचा आदेश

ठळक मुद्देच्सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी तयारनव्या आदेशानुसार पुरवणी यादीही तयार करण्यात आली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन्ही बाजार समितीची प्रारुप मतदार यादी नव्याने

सोलापूर : सामाईक खात्यावर प्रत्येकी १० गुंठ्यांपेक्षा अधिक शेतजमीन धारण करणाºया शेतकºयांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. १५ मे पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे आणि त्यानंतर तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने सहकार प्राधिकरणाला दिले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीत सामाईक खात्यावर एकाच शेतकºयाला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय पणन खात्याने घेतला होता. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यादरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील कार्यकर्ते संजय भोसले यांच्यासह ११९ शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

 न्यायालयाने १० गुंठ्यांपेक्षा अधिक शेतजमीन धारण करणाºया खातेदारांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय दिला. भोसले यांच्या वतीने अ‍ॅड. अनिल साखरे, अ‍ॅड़ बाळकृष्ण जोशी, अ‍ॅड़ रोहन मिरपुरी तर सहकार प्राधिकरणाकडून अ‍ॅड़ दिलीप बनकर-पाटील यांनी काम पाहिले. नव्या आदेशामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या ४५ हजार शेतकºयांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. 

प्राधिकरणाने दिला संभाव्य कार्यक्रम उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार एप्रिलअखेर सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया होणे अपेक्षित होते. परंतु, मतदार यादीतील घोळामुळे प्रारुप मतदार याद्या तयार व्हायला वेळ लागला. सहकार प्राधिकरणाने यापूर्वी दिलेल्या शपथपत्रात मे महिन्यात निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारी असल्याचे सांगितले होते. आता नव्या आदेशानुसार प्रारुप मतदार यादी केल्यानंतर १५ मेपर्यंत अंतिम यादी तयार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ५ जूनपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख, २१ जूनपर्यंत अर्ज मागे घेणे, २२ जूनला अंतिम उमेदवार यादी, ४ जुलैला मतदान आणि ६ जुलै रोजी मतमोजणी घेऊ असे कळविले आहे. 

नव्याने मतदार यादी, नव्याने हरकतीच्सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी तयार आहे. नव्या आदेशानुसार पुरवणी यादीही तयार करण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन्ही बाजार समितीची प्रारुप मतदार यादी नव्याने करण्यात येईल. त्यावर नव्याने हरकती घेण्यात येतील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकFarmerशेतकरीCourtन्यायालय