शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहर पोलिस दलातील चौदा पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 16:43 IST

पोलीस आयुक्तांचा आदेश : पोलीस खात्यात अचानक उडाली खळबळ

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या चौदा पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक निघालेल्या बदल्यांच्या आदेशामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आलेे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे (जेलरोड पोलीस ठाणे), जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत (जोडभावी पेठ पोलीस ठाणे), सायबर सेलचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील (फौजदार चावडी पोलीस ठाणे), आरसीपीचे पाेलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर (एमआयडीसी पोलीस ठाणे), जोडभावी पेठ पोलीस ठाणे, दुय्यम पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), जोडभावी पेठ पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम (सुरक्षा शाखा), जेलरोड पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे (अतिक्रमण प्रतिबंधक विभाग), फौजदार चावडी पोलीस ठाणे, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट (नियंत्रण कक्ष),.

एमआयडीसी पोलीस ठाणे, संजय पवार (आरसीपी), एमआयडीसी पोलीस ठाणे दुय्यम पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद, फौजदार चावडी पोलीस ठाणे, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट (जेलरोड पोलीस ठाणे), शहर वाहतूक शाखा (दक्षिण) पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे (एमआयडीसी पोलीस ठाणे), अतिक्रमण विभाग, पोलीस निरीक्षक सय्यद (सायबर सेल) अशी नावे आहेत.

 

नियंत्रण कक्षातील चार अधिकाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली

  • - नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संपत पवार व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टी. सुनगर यांची बदली शहर वाहतूक शाखा उत्तर येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांची शहर वाहतूक शाखा उत्तर तर पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे यांची बदली शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे बदली करण्यात आली आहे.
  • - बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ संबंधित बदलीच्या ठिकाणी चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले असून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसTransferबदली