शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात आगीमुळे एका वर्षात चौदा कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:16 IST

अग्निशमन दिनी हुतात्म्यांचे स्मरण; ३९२ आगी विझवल्या; एक कोटीवर किमतीची मालमत्ता वाचवली

ठळक मुद्देमहापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले१ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले२ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे वर्षभरात शहर व जिल्ह्यातील ३९२ आगी विझवण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात १३ कोटी ८१ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. आजच्या अग्निशमन दिनी आग विझविताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल हे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करीत २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. शहरात एकूण पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या दलाकडे सर्व मिळून ९ गाड्या असून त्यापैकी एका अपघाताच्या वेळी त्वरित मदत करण्यासाठी एक स्पेशल अ­ॅडव्हान्स रेस्क्यू टेंडर गाडी आहे. अरूंद रस्ते व लहान गल्लीबोळमधील आग विझवण्याकामी एक मिनी फायटर वाहन, दोन फोम टेंडर फायटर गाड्या उपलब्ध आहेत. 

फोम टेंडर फायटर वाहनाचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगीवर अत्यंत उपयुक्त आहे. महापालिका हद्दीत आग विझवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शहरातील जनतेसाठी आग, अपघात आणि आणीबाणीप्रसंगी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. महापालिका हद्दीत वर्षभरात ३ हजार ८१ आगी विझवण्यात आल्या आहेत. ४५ अपघात ठिकाणी मदतकार्य केले आहे. ११ कोटी ४२ हजार ७८ हजार ४५२ रुपये किमतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ५ लाख ५० हजार रुपये किमतीची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

महापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले आहे. २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र १ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले आहे. 

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो दिन...- दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये मोठी आग लागली होती. ही आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ कर्मचाºयांना आपले प्राण गमवावे लागले होते. अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार अग्निशमन दिन साजरा केला जातो. 

आग ही आपोआप कधी लागत नाही, बºयाच वेळेला आपला निष्काळजीपणा व नियम न पाळल्याने लागत असते. आपला शत्रू समजून त्याच्यापासून स्वत:चे व मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. - केदार आवटे, अधीक्षक, अग्निशमन दल. 

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग