शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कार आडवी आल्यानं ब्रेक दाबला; रिक्षा पलटी होऊन चौघे प्रवासी जखमी

By विलास जळकोटकर | Updated: June 6, 2024 18:39 IST

विडी घरकूल येथील घटना : जखमींमध्ये तिघा वृद्धांचा समावेश.

विलास जळकोटकर, सोलापर : मुळेगाव रोड येथून शहरातील कौंतम चौकाकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या येणाऱ्या रिक्षाच्या समोर कार आडवी आली. अचानक ब्रेक दाबला गेल्यानं रिक्षा पलटी होऊन चार प्रवासी जखमी झाले. गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास विडी घरकूलजवळील चंदन काट्याजवळ हा अपघात झाला. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अब्दुल रशिद बागवान (वय- ६८, रा. बागवान नगर, सोलापूर), मुमताब अब्दुल रशिद बागवान (वय- ६६) गोपाळ गंगाराम सदाफुले (वय ७६, गणेश नगर, सोलापूर), जिलानी सैपनसाब शेख (वय- ४३, राघवेंद्र नगर, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींमध्ये तिघा वृद्धांचा समावेश आहे.यातील जखमी असलेले चौघे गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास मुळेगाव रोड येथील विविध नगरात राहणारे प्रवासी शहरातील कोंतम चौकाकडे कामानिमित्त रिक्षामधून येत होते. प्रवाशांनी भरलेली रिक्षा मुळेगाव रोडवरील चंदन काट्याजवळ आली असताना अचानक समोर कार आडवी आली. अपघातापासून रोखण्यासाठी रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाखला. यामुळे रिक्षा पलटी होऊन चौघांना डोक्यास, हातापायासह सर्वांगास मार लागला. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चौघांवर उपचार सुरु आहेत. सर्वजण शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात