शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

वॉटर कपसाठी बार्शी तालुक्यातील चार गावांत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 15:53 IST

बार्शी तालुका : प्रथम क्रमांकाचे १० लाख कोणते गाव पटकावणार?

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा ४५ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलीबार्शी तालुक्यात वार्षिक २५० कोटी लिटर पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमताभारतीय जैन संघटनेने आर्थिक पाठबळ

धनाजी शिंदे वैराग : बार्शी तालुक्यात सत्यमेव जयते ‘वॉटर कप स्पर्धा -२०१८’मध्ये प्रथम क्रमांक व १० लाख रुपयांचे बक्षीस पटकावण्यासाठी चुंब, खडकोणी, राळेरास, रातंजन या चार गावांत चुरस निर्माण झाली आहे. या चार गावांची निवड मूल्यांकनातून झाली आहे. याचा फैसला १२ आॅगस्ट रोजी पुणे येथे होणाºया बक्षीस वितरण कार्यक्रमात होणार आहे. प्रथम क्रमांक कोण पटकावणार याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

बार्शी तालुक्यात २०१८ वॉटर कप स्पर्धा (८ एप्रिल ते २२ मे २०१८) या ४५ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आली. यामध्ये ४९ गावांनी सहभाग घेतला. त्यापैकी ३४ गावांनी प्रशिक्षण घेतले. तालुक्यात या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांनी केलेला लोकसहभाग श्रमदान, यांत्रिक पद्धतीने सुमारे २५ लाख घनमीटरचे काम झाले. 

या कामामुळे बार्शी तालुक्यात वार्षिक २५० कोटी लिटर पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता झाली. शासकीय मूल्यांकनाने या कामाची किंमत ५० कोटी रुपये इतकी होते, मात्र हे काम केवळ ४५ दिवसात झाले. यासाठी हजारोंचा लाभलेला लोकसहभाग, प्रशासकीय अधिकाºयांचा थेट सहभाग, बार्शीचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचे प्रोत्साहन व थेट सहभाग, भारतीय जैन संघटनेने आर्थिक पाठबळामुळे तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे उभी राहिली. 

तसेच पाणी फाउंडेशनच्या टीमला ग्रामस्थांच्या श्रमाचे मोल, महत्त्वाचे व या उपक्रमाला वेळोवेळी मार्गदर्शन करता आले. रविवारी १२ आॅगस्ट रोजी राज्यभरातील सहभागी गावातून नियम, गुण व मूल्यांकनातून निवडलेल्या गावामध्ये राज्य व तालुकास्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते अमीर खान, उद्योगपती व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

ही आहेत गावे- तालुक्यातील चुंब, खडकोणी, राळेरास, रातंजन या चारपैकी एका गावाची तालुक्यातून निवड केली जाणार आहे. निवडलेल्या गावास सन्मानपत्र, १० लाख रुपयांचे बक्षीस ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने दिले जाणार आहे. यामध्ये कोणत्या गावाची निवड होणार, याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय