शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Teachers day special; शाळेत रचला पाया, व्यवसायातही सर रचतायेत मार्गदर्शनाची वीट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 11:27 IST

सुनील फुरडे म्हणतात; त्या काळात तळमळीने शिकविणारे शिक्षक, शेतकºयाच्या मुलाला यशाचा मार्ग दाखविणारे गुरूजनच !

ठळक मुद्देपहिलीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण देणारे अनेक शिक्षक आहेतशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच माझे जीवन घडलेमाझे आयुष्य उज्ज्वल करणाºया सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते

राजकुमार सारोळे 

सोलापूर : मी शेतकºयाचा मुलगा. ३५ वर्षांपूर्वी राज्यात फक्त  ७ सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज होते. या कॉलेजला प्रवेशासाठी चांगले मार्क्स आवश्यक होते. इंजिनिअर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले ते केवळ गुरूजनामुळेच.. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील फुरडे यांच्या या भावना.

धोत्रे सरांमुळे आयुष्याला आकारबार्शीतील जगदाळेमामा कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. बारावीनंतर इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळविण्यासाठी चांगले मार्ग मिळविणे गरजेचे होते. यासाठी प्रा. शशिकांत धोत्रे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ज्ञानदान हे पवित्र कार्य आहे, असे मानून ते तळमळीने सर्व विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांच्या प्रेरणेने आयुष्याला आकार मिळाला.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात मला अनेक गुरू भेटले. यात प्रत्येकाचे स्थान मोलाचे आहे. पण प्रा. शशिकांत धोत्रे यांनी टर्निंग पॉइंटवर असताना जीवन घडविले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेला स्पार्क ओळखून ते मार्गदर्शन करायचे. शिस्त आणि टापटीपपणा असायचा. त्यामुळे कॉलेजला वेळेत हजर राहणे गरजेचे असायचे.  परीक्षेत नेमके काय विचारले जाते यावर त्यांचा जादा भर असायचा. इंजिनिअरिंग म्हणजे बांधकाम, रस्ते असेच काम असे आम्ही समजायचो. पण वर्गात ते काटेकोरपणे सगळ्या गोष्टी तळमळीने समजावून सांगायचे. त्यामुळे त्यांचा प्रभाव राहिला.

आज व्यवसायात असलो तरी मार्गदर्शन...इंजिनिअर व्हायचे माझे स्वप्न धोत्रे सरांमुळे पूर्ण झाले. पदवी मिळाल्यानंतर बाळे येथील कॉलेजमध्ये सात वर्षे लेक्चरर, विभागप्रमुख व प्राचार्य म्हणून काम केले.  त्यानंतर बाहेर पडून बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. आज अनेक लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. आलेल्या लोकांनी सर म्हटले की, मला धोत्रे सरांच्या शिकवणीची आठवण येते. बांधकाम व्यवसायात असलो तरी कार्यालयात येऊन धोत्रे सर मला नेहमी मार्गदर्शन करतात. 

धोत्रे सर प्लॉटवर आलेबारावीत ९२ टक्के मार्क मिळाल्यानंतर कºहाड कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मी इंजिनिअर झालो. बाळे येथे साडेसात वर्षे ज्ञानदानाचे काम केले व त्यानंतर बांधकाम क्षेत्रात उतरलो. येथेही त्यांचे मार्गदर्शन राहिले. गतवर्षी बाळे येथे सुरू असलेले काम पाहण्यास गेलो तर तेथे आधीच धोत्रे सर आले होते. 

पहिलीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण देणारे अनेक शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच माझे जीवन घडले. माझे आयुष्य उज्ज्वल करणाºया सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते.  

- सुनील फुरडे

टॅग्स :SolapurसोलापूरTeachers Dayशिक्षक दिन