शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 11:29 IST

माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (वय 72) यांचे आज रविवार पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे वडील माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (वय 72) यांचे आज रविवार पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील निवासस्थानाहून सायंकाळी 4 वाजता निघेल आणि अंत्यविधी आईसाहेबनगर, फलटण येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली. माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचे ते वडील होते.

सोलापूर :  माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे वडील माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (वय 72) यांचे आज रविवार पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील निवासस्थानाहून सायंकाळी 4 वाजता निघेल आणि अंत्यविधी आईसाहेबनगर, फलटण येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली. माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचे ते वडील होते. जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर त्यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार राहिलेल्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा राजकीय प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे हा प्रवास थांबला आहे. माजी खासदार नाईक निंबाळकरांचा सातारा जिल्ह्यातील शेनवडी गावात त्यांचा १५ ऑगस्ट १९४८ रोजी जन्म झाला. पुढे दहावीपर्यंत शिक्षण घेता आले, त्यांनी १९९५मध्ये फलटण नगरपरिषदेवर उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली, यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या, मात्र त्यांना यात काही  वेळा अपयश आले. तिसऱ्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी घेतलेले हिंदुराव नाईक निंबाळकर तिरंगी लढतींमध्ये विजयी झाले. सातारा लोकसभा मतदारसंघातून अकराव्या लोकसभेसाठी खासदार म्हणून त्यांनी शपथ घेतली, त्यांनी फलटण, माळशिरस, माण या भागातील दुष्काळी गावांसाठी धोम बलकवडी, नीरा देवधर टेंभू या योजनांसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला.लोणंद पंढरपूर नीरा देवधर प्रकल्प यासाठी अनेक वेळा मोर्चे सभा गाव भेट दौऱ्याचे त्यांनी नेतृत्व केले. नीरा देवधर पाणी हक्क समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर व माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातही त्यांनी नीरा देवधर प्रकल्पातील गावांचा दौरा केला होता. सध्या त्यांचा मुलगा रणजित नाईक निंबाळकर माढा मतदारसंघातून लोकसभेेचे प्रतिनिधित्व करीत आहेत