शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 15:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार ( वय ६८) यांचे गुरुवार दि २५ रोजी सकाळी सहा वाजता  सोलापूर येथील तोष्णीवाल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले.  त्यांना न्यूमोनिया  झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून सोलापूर येथे  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या मकानदार यांनी अगदी अल्पकाळात मंगळवेढ्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. सुरुवातीला ते शहा गटातून नगरसेवक झाले. १९९९ साली ते नगराध्यक्ष झाले. माजी नगराध्यक्ष रतनचंद शहा, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, दूध संघाचे संचालक बबनराव आवताडे, आमदार समाधान आवताडे, धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळूनगे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 

वीट उद्योजक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध होते. त्यांनी वीट व्यवसायातून मंगळवेढयाची दोन राज्यात ओळख निर्माण करून दिली होती. त्यांच्या कार्याचे सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुंडे यांनीही कौतुक केले होते. अल्पशिक्षित मकानदार यांनी मोठमोठ्या शिक्षण संस्थाना मदत केली. त्यांचे परममित्र बंडोपत बुरजे यांचे गत महिन्यात निधन झाले होते. दोघे वेगवेगळ्या धर्माचे असतानाही त्यांची घट्ट मैत्री होती. त्यांच्या निधनाचाही त्यांना धक्का सहन झाला नाही. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बाबूभाई मकानदार यांनी अनेक गोरगरीब, गरजूंना मदतीचा हात दिल्याने ते अजातशत्रू नेतृत्व म्हणून मंगळवेढा तालुक्यात परिचित होते. शिवजयंती, नवरात्र उत्सव, गैबीपीर उर्स, लतीफशाह उर्स मध्ये ते नेहमी अग्रभागी होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात  येणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू