महिम (ता. सांगोला) येथील अण्णासो कोळेकर या तरुणाचे बीएससी अँग्रीचे शिक्षण झाले आहे. त्याने महिम ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेकापक्ष पुरस्कृत सिद्धनाथ बहुजन ग्राम विकास आघाडीकडून वाॅर्ड क्र. ४ मधून प्रतिस्पर्धी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत सिद्धनाथ परिवर्तन आघाडीचे उमेदवार उत्तम संदिपान कारंडे यांच्याविरोधात अर्ज भरला होता. या निवडणुकीत सुशिक्षित तरुण चेहऱ्याचा उमेदवार गावाच्या विकासासाठी काहीतरी करेल, या आशेपोटी त्याला निवडून देण्याचे ठरवले. त्यानुसार अण्णासो कोळेकर यांनी महाविकास आघाडीचे ७५ वर्षीय उमेदवार उत्तम कारंडे यांचा २८ मताने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अण्णासाहेब कोळेकर यास ६३४ पैकी ३२८ तर विरोधी उत्तम कारंडे यांना ३०० मते मिळाली. विजयी उमेदवार अण्णासो कोळेकर याच्या घरात कोणताही राजकीय वारसा व निवडणुकीचा अनुभव नसताना लढवून मिळवलेला विजय तरुणांना चांगलाच खुणावत आहे.
माजी ग्रा.पं. सदस्याचा पराभव करून पदवीधर युवकाचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST