शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीला कंटाळून सोलापूर महापालिका परिवहन विभागातील माजी कर्मचाºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:58 IST

सोलापूर : सोलापूर परिवहन विभागातील माजी कर्मचारी अय्युब हसन खान (वय-५४, रा. विजापूर नाका झोपटपट्टी, सोलापूर) याने  बेरोजगारीला कंटाळून ...

ठळक मुद्देअय्युब हसन खान हे गेल्या २0 वर्षांपासून सोलापूर परिवहन विभागात कामाला होतेगेल्यावर्षी तब्बल आठ महिने त्यांचा पगार झाला नव्हतालवकर मुलीचे लग्न उरकावे असा विचार अय्युब खान करीत होते.

सोलापूर : सोलापूर परिवहन विभागातील माजी कर्मचारी अय्युब हसन खान (वय-५४, रा. विजापूर नाका झोपटपट्टी, सोलापूर) याने  बेरोजगारीला कंटाळून बुधवारी पहाटे गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. 

अय्युब हसन खान हे गेल्या २0 वर्षांपासून सोलापूर परिवहन विभागात कामाला होते. गेल्यावर्षी तब्बल आठ महिने त्यांचा पगार झाला नव्हता, त्यामुळे उपजीविका करायची कशी हा मोठा प्रश्न अय्युब खान यांच्या समोर होता. अय्युब खान यांना पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

एसएमटीमध्ये पगार होत नसल्याने सुट्टी टाकून अय्युब खान यांनी नोव्हेंबर २0१७ मध्ये कुटुंबीयांसमवेत पुणे गाठले. पुण्यात एका गॅरेजमध्ये काम करीत होते. कामाचा पगार, राहण्याचे भाडे आणि दैनंदिन खर्च याचा मेळ बसत नव्हता. तरीही आज नाही तर उद्या काहीतरी फरक पडेल या अपेक्षेने ते पुण्यात काम करत होते. परिवहन विभागाची आशा मावळल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी सोलापुरात येऊन नोकरीचा राजीनामा दिला होता. 

राजीनामा देऊन पुन्हा ते पुण्याला गेले होते; मात्र त्या ठिकाणी चरितार्थ चालवणे अवघड झाल्याने अय्युब खान यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. 

शेवटची मागणी...- अय्युब खान यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा सलमान हा खासगी टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. मुलीने फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आपल्या सर्व पाहुण्यांमध्ये मुलगा पाहण्यास सांगितले होते. लवकर मुलीचे लग्न उरकावे असा विचार अय्युब खान करीत होते. मुलगा सलमान हा टेम्पो घेऊन हुबळी येथे जात होता, रात्री सर्वांसोबत जेवण केले. मुलास रस्त्याने व्यवस्थित जा, येताना मला चांगली चप्पल घेऊन ये असे सांगितले होते. पण मुलगा हुबळीत असताना सकाळी ६ वाजता बहिणीचा फोन गेला व घरी येण्यास सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSuicideआत्महत्याEmployeeकर्मचारी