शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बेकरीत काम करणारे परप्रांतीय मजूर आता शेती कामात गुुंतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:42 IST

परप्रांतीय मजुरांची विनवणी; हमको हमारे गाव जाना है, भेजने का इंतजाम करो !

ठळक मुद्देलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवस स्वत:जवळील पैसे खर्च करून पोट भरलेकाही बेकरी व्यवसायातील मजूर सध्या उपासमार होण्यापेक्षा शेतीच्या कामावर

करमाळा : लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत आम्ही कसेबसे दिवस काढले पण आता खूपच हाल होत आहेत़ आता थांबणे मुश्कील होत आहे असे म्हणत ‘हमको हमारे गाव जाना है, गाव भोजने का इंतजाम करो’, अशी विनवणी रेल्वे लाईन, रस्ते, बेकरी या कामांसाठी आलेले परप्रांतीय मजूर संबंधित ग्रामपंचायतीकडे करू लागले आहेत़ बेकरीत काम करणारे मजूर मात्र शेतात कामाला जाऊ लागले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले आहे. तेव्हापासून आजपर्यंत या मजुरांची कामे बंद आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील केत्तूर, जिंती, पारेवाडी, वाशिंबे या गावांत आलेले शेकडो परप्रांतीय मजूर लॉकडाऊनमध्ये येथेच अडकले आहेत़ आता त्यांना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. इतके दिवस कसेबसे काढले मात्र आता आमची उपासमार होत आहे. त्यामुळे ते संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे विनवणी करू लागले आहेत.

तालुक्यातील अनेक मजूर उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व राजस्थान येथील आहेत़ आपापल्या गावी जाण्यासाठी या मजुरांची धडपड सुरु असून, रोज ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, सरकारी दवाखाना या ठिकाणी त्यांचे हेलपाटे सुरु आहेत. 

गेल्या १५ दिवसांपासून हे सर्व मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. यातील अनेक मजूर हे मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरु असून, त्यासाठी आले होते. बाकीचे बेकरी व्यवसाय, राजस्थान येथील फरशी बसविणारे मजूर तसेच जेऊर ते पारेवाडी - बाभुळगाव या चाललेल्या राज्यमार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी येथे आले होते. 

या महामारीच्या काळात  आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने अनेक मजूर भेदरलेल्या अवस्थेतही आहेत. तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ‘हमको गाव भेजने का इंतजाम करो, हमको हमारे गाव जाना है’ अशी विनवणी ते ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांना करीत आहेत. स्थानिक प्रशासन पाठपुरावा करीत आहे. पण वरिष्ठ स्तरावरून कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे. 

सध्या काही ठिकाणांवरून रेल्वेगाड्या जात आहेत. त्यामुळे आम्हालाही प्रशासनाने रेल्वेची सोय करून गावाकडे जाण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करू लागले आहेत़ सध्या लॉकडाऊनमुळे त्यांना गावात फिरण्यासही मर्यादा आहेत. ऊन असल्याने राहत असलेल्या खोल्यांमध्ये त्यांना फिजिकल डिस्टन्सही पाळता येत नाही. 

बेकरी व्यवसायातील मजूर शेतीच्या कामावरलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवस स्वत:जवळील पैसे खर्च करून पोट भरले़ पण आता पैसे संपलेले आहेत़ खाण्यासाठी काहीही मिळत नसल्याने काही बेकरी व्यवसायातील मजूर सध्या उपासमार होण्यापेक्षा शेतीच्या कामावर जात असल्याचे दिसून येत आहे़

घाबरलेल्या स्थितीत मजूरच्जर आम्हाला कोरोना झाला तर येथे पाहण्यासाठी आमचे कोणी नाही. त्यामुळे ते सर्व मजूर भेदरलेले आहेत. सोलापूर किंवा कुर्डूवाडी येथून रेल्वे जाणार आहे. अशी त्यांच्यामध्ये चर्चा सुरु असल्याने त्यातील काही मजूर कुर्डूवाडीला जाण्याच्या तयारीत आहेत़ घरी जाण्यासाठी या मजुरांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे पण त्यांना अधिकृत अशी कोणतीच माहिती मिळत नसल्याने ते सध्या संभ्रमात आहेत. आपल्या गावाकडे केव्हा जाऊ याचा त्यांना अजूनही थांगपत्ता नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस