शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने सोलापुरातील पाचशे लोकांची भागतेय भूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:56 IST

नैवेद्य देवाला... बेघरांच्या पोटाला; फोडलेले नारळ विक्रीला : आषाढ महिन्यातील प्रथा; मंदिरांमधील पुजाºयांचे असेही अन्नदान

ठळक मुद्देआषाढ महिन्यात लक्ष्मीआई , मरिआई, मावलाई, मारुती, म्हसोबा या देवतांना नैवेद्य दाखविण्याची प्रथा देवतांपुढे ढिगाºयाने हेच ठेवलेले नैवेद्य वजा अन्न काही गरीब कुटुंबाची भूक भागवताना दिसत कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच मंदिरे बंद आहेत; मात्र जुन्या रुढी, प्रथा, परंपरा, चालीरिती काही बंद होत नाहीत

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच मंदिरे बंद आहेत; मात्र जुन्या रुढी, प्रथा, परंपरा, चालीरिती काही बंद होत नाहीत. आषाढ महिन्यात विविध देवतांना नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. कोरोनाच्या काळात देखील ही परंपरा जोरात सुरू असून, देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने पाचशे लोकांची भूक मात्र भागतेय. 

आषाढ महिन्यात लक्ष्मीआई , मरिआई, मावलाई, मारुती, म्हसोबा या देवतांना नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. सिव्हिल येथील महालक्ष्मी मंदिर, विजापूर वेस येथील मरिआई मंदिर, मरिआई चौकातील मरिआई मंदिर आणि रुपाभवानी मंदिर येथे आलेल्या नैवेद्यामुळे पाचशे लोकांची भूक भागवली जात आहे. 

तर देवतांपुढे ढिगाºयाने हेच ठेवलेले नैवेद्य वजा अन्न काही गरीब कुटुंबाची भूक भागवताना दिसत आहे. हे ठेवलेले नैवेद्य काही माणसे, लहान मुले गोळा करून घरी नेतात. 

१० रुपयाला पाच नारळ वाट्याशहरातील अनेक मंदिरांमध्ये आषाढ महिन्यातील आलेले नैवेद्य अनेक गोरगरिबांना वाटप केले जाते; मात्र देवासमोर आलेले नारळ मात्र हॉटेल व्यावसायिक आणि भाविकांना दिले जातात, कोरोना काळाच्या अगोदर दहा रुपयात तीन नारळाच्या वाट्या मिळत होत्या, आता आषाढ महिन्यातील मंदिरातील गर्दी वाढली आहे.त्या वाट्या दहा रुपयाला पाच अशा विकल्या जात आहेत.

असे होते नैवेद्याचे वाटपसिव्हिलमधील महालक्ष्मी मंदिरात आलेल्या नैवेद्याचे वाटप दीडशे गोरगरीब आणि बेघर लोकांना पुजारी  वाटप करतात. विजापूर वेस येथील मरिआई मंदिरात आलेले नैवेद्य गोरगरिबांना वाटप केले जाते. याचबरोबर बोरामणी येथून खास नैवेद्य घेण्यासाठी नामदेव रिक्षा करून येऊन आपल्या नातेवाईकांमधील वीस कुटुंबांना नैवेद्य वाटप करतात त्यामुळे येथून जवळपास ८0 लोकांची भूक भागते असे नामदेव सांगतात.

रुपाभवानी मंदिरात देखील आलेल्या नैवेद्याचे वाटप गोरगरिबांना केले जाते, त्यामुळे आसपासच्या १०० लोकांची भूक भागते तसेच जास्त प्रमाणात नैवेद्य आल्यास शहरातील अन्य संस्थेमार्फत ते बेघर आणि गरजू लोकांना वाटप केले जाते असे पुजाºयांनी सांगितले.मरिआई चौकातील मरिआई मंदिरात आलेल्या नैवेद्याचे वाटप येथील तिन्ही पुजाºयांमार्फत कोनापुरे चाळ, लष्कर येथील शंभर गरजवंतांना केले जाते. याचबरोबर देवासमोर वाढवण्यासाठी आलेले नारळ देखील लोकांना वाटप केले जातात असे पुजारी माडे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर