शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने जतन केलेल्या सापाच्या अंड्यातून पाच पिल्ले बाहेर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 11:32 IST

सर्पमित्रांनी शास्त्रीय पध्दतीने अंड्याला दिले अनुकूल वातावरण; नैसर्गिक आवासात सोडण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देसापाच्या मोजक्या काही जाती सोडल्या तर त्यांना उबविण्याची गरज नसतेबाळे येथे सापडलेल्या सापाच्या अंड्यांना उबविण्याची गरज नव्हतीअंड्यांना बुरशी लागू नये, गरजेपुरती हवा मिळणे महत्त्वाचे होते

सोलापूर : तीन महिन्यांपूर्वी बाळे येथे तस्कर या बिनविषारी सापाची सात अंडे आढळली. सर्पमित्रांनी शास्त्रीय पद्धतीने या अंड्यांची तब्बल तीन महिने काळजी घेतली. त्यांच्या या कष्टाला यश आले असून, अंड्यांमधून आता पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सातपैकी पाच अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली आहेत, अशी माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे पप्पू जमादार यांनी दिली.

बाळे येथील खडक गल्लीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता एक तस्कर जातीचा साप जाताना तेथील रहिवासी कासीम पठाण यांना दिसला. त्यांनी याची माहिती संतोष धाकपाडे यांना दिली. काही वेळातच धाकपाडे तेथे पोहोचले. त्यांनी एका कपाटाखाली लपलेल्या सापाला पकडून बरणीमध्ये बंद केले. काही वेळानंतर त्या सापाला सोडण्यासाठी म्हणून बरणी उघडली. त्यावेळी त्या मादी सापाने बरणीत चक्क सात अंडी घातली होती.  अंडी ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत असताना तेथील लोकांनी त्या सापाला पाहिले होते. यानंतर सर्पमित्रांनी सापाला नैसर्गिक आवासात सोडून दिले. 

फक्त सापांच्या काही जाती अशा आहेत की जी अंडी दिल्यानंतर त्यातून पिल्लं बाहेर येईपर्यंत त्याची निगा राखतात. बाकीचे साप अंडी घातल्यानंतर ती अंडी सोडून निघून जातात. या तस्कर सापाची अंडी खराब होऊ नये म्हणून संतोष धाकपाडे यांनी नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा आणि डॉ. प्रतीक तलवाड यांच्याशी संपर्क साधून त्या अंड्याची निगा कशी राखायची याचे मार्गदर्शन घेतले.

अशी घेतली अंड्यांची काळजी- सापांची अंडी रबरासारखी मऊ कवचाची व लांबट असतात. त्यांना योग्य तापमानासोबत योग्य आर्द्रता द्यावी लागते. एका मोठ्या बरणीत वाळू, खडी आणि फरशीचे तुकडे व तसेच अर्धा ग्लासभर पाणी टाकून योग्य तापमान तयार केले. त्यात अंडी ठेवली. अंडी मिळालेल्या दिवसापासून ११५ दिवसांत सात अंड्यांपैकी पाच अंड्यातून पाच पिल्लांचा जन्म झाला. ही सापाची पिल्ले साधारण १० ते १२ इंच लांबीची आहेत. लहानपणापासूनच छोटी पाल, उंदीर, कीटक यांची शिकार करून निसर्गात राहू शकतात.

सापाच्या मोजक्या काही जाती सोडल्या तर त्यांना उबविण्याची गरज नसते. बाळे येथे सापडलेल्या सापाच्या अंड्यांना उबविण्याची गरज नव्हती, मात्र त्यांना विशिष्ट वातावरणाची गरज असते. अंड्यांना बुरशी लागू नये, गरजेपुरती हवा मिळणे महत्त्वाचे होते. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर २४ ते ४८ तासात ते पहिल्यांदा कात टाकतात. जन्मानंतर पहिल्या आठवड्यात ते काही खात देखील नाहीत. या सर्व पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक आवासात आम्ही सोडणार आहेत.- डॉ. प्रतीक तलवाड

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण