शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आधी उपचार अन् नंतर अंत्यविधीसाठी ‘लढत राहिले’ सीमेवरील तैनात दोन जवान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:29 IST

असंवेदनशीलता : मार्डीतील राजमाने कुटुंबीयासोबत घडलेला प्रकार; झेडपी सीईओंनी घातले लक्ष

ठळक मुद्देलष्करी सेवेत असलेली दोन्ही मुले आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी धडपडत होतीरडत रडतच आपल्या व्यथा अधिकाºयांना सांगत होतीसायंकाळी अंत्यविधी झाला. दोघांनीही व्हिडिओ कॉलवरुन वडिलांचे अंत्यदर्शन घेतले

राकेश कदम

सोलापूर : आमच्या वडिलांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडून आहे. आता किमान त्यांचा अंत्यविधी तरी वेळेवर करा, अशी आर्त हाक भारतीय लष्करातील जवानांनी सोलापूरच्या प्रशासकीय यंत्रणेला दिली. तरीही प्रशासकीय यंत्रणा हलली नाही.

मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील पंडित राजमाने यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. राजमाने यांची दोन मुले कुमार राजमाने आणि संदीप राजमाने लष्करी सेवेत आहेत.  संदीप हे जम्मूमध्ये तर कुमार हे लखनऊ येथे कार्यरत आहेत. 

पंडित राजमाने यांना गुरुवारी धाप लागत असल्याने त्यांचे पुतणे शशिकांत राजमाने आणि प्रवीण मुडके यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटलमधील लोक माझ्यावर व्यवस्थित उपचार करीत नाहीत. मला श्वास घ्यायला त्रास होतोय, असे पंडित राजमाने आपल्या मुलांना आणि नातेवाईकांना सांगत होते. शशिकांत आणि प्रवीण यांनी गुरुवारी सिव्हिलच्या डॉक्टरांकडे डिस्जार्च देण्यासाठी तगादा लावला, परंतु रुग्णाचा स्वॅब घेतला आहे. रिपोर्ट आल्याशिवाय त्यांना डिस्जार्च देता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी रिपोर्ट आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

प्रवीण मुडके म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलमधून मार्कंडेयमध्ये नेण्यासाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स आली. ही अ‍ॅम्ब्युलन्स पाऊण तास रुग्णालयाच्या बाहेरच उभी होती. आत आल्यानंतर पंडित राजमाने यांना बाहेर आणले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना आॅक्सिजन मिळावा कोणत्याही प्रकारचे उपाय केलेले नव्हते. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यासाठी लोक मदतीला आले नाहीत. अखेर आम्हीच ग्लोज घालून त्यांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दाखल केले. सिव्हिलमधून मार्कंडेयमध्ये पोहोचताच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मृतदेह पुन्हा सिव्हिलमध्ये आणला तर दाखल करुन घ्यायला तीन-चार तास लावले. 

अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांचा पंचनामा झाला पाहिजे. पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवू असे सिव्हिल हॉस्पिटलमधील लोकांनी सांगितले. पोलिसांच्या या रिपोर्टची आम्ही रविवारी दिवसभर वाट बघत होतो.

वायचळ यांच्या फोननंतर झाल्या हालचाली‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आणि त्यांचे स्वीय सहायक अविनाश गोडसे यांच्या कानावर घातली. वायचळ यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोन केले. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. सायंकाळी सहा वाजता पंडित राजमाने यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.

मुलांनी व्हिडिओ कॉलवरुन घेतले वडिलांचे अंत्यदर्शनलष्करी सेवेत असलेली दोन्ही मुले आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी धडपडत होती. रडत रडतच आपल्या व्यथा अधिकाºयांना सांगत होती. सायंकाळी अंत्यविधी झाला. दोघांनीही व्हिडिओ कॉलवरुन वडिलांचे अंत्यदर्शन घेतले.     

अधिकारी म्हणाले डिटेल पाठवा बघतो...कुमार राजमाने यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून लखनऊमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संदीप अद्यापही जम्मूमध्ये कार्यरत आहेत. आपल्या वडिलांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी ते फोनवरुन सिव्हिलमधील डॉक्टरांना फोन करीत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी व्हावा यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिलचे अधिष्ठाता, जिल्हाधिकारी यांना फोन केले. प्रत्येकाने डिटेल माहिती पाठवा. आम्ही कार्यवाही करतो, असे सांगितले, परंतु रविवारी साडेचारपर्यंत हालचाली झाल्या नव्हत्या.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू