शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वडवळमध्ये यंदा पहिल्यांदाच ‘एक गाव-एक शिवजयंती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:16 IST

बंडोपंत कुलकर्णी वडवळ : यंदा वडवळवासीय करणार असलेला शिवजयंतीचा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे. ‘एक गाव-एक शिवजयंती’ हा नारा देत ...

ठळक मुद्देवडवळ येथे गेल्या वर्षापासून गावातील सर्वच तरुणांनी, ग्रामस्थांनी एकत्र येत एकमुखी निर्णय घेऊन ‘एक गाव-एकच शिवजयंती’ साजरी करण्यास प्रारंभ यंदा विधवा महिलांच्या हस्ते शिवप्रतिमेची स्थापना करण्याचा निर्णय मंडळाने घेतलासामाजिक परिवर्तनाची नांदी असलेला हा पायंडा शिवचरित्राची ख्याती सर्वदूर पोहोचविणारा ठरणार

बंडोपंत कुलकर्णी

वडवळ : यंदा वडवळवासीय करणार असलेला शिवजयंतीचा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे. ‘एक गाव-एक शिवजयंती’ हा नारा देत यंदाची शिवजयंती साजरी होणार असल्याने अख्खे गावच या उत्सवाच्या तयारीत गुंतल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून, यंदा विधवा महिलांच्या हस्ते शिवप्रतिमेची स्थापना करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सामाजिक परिवर्तनाची नांदी असलेला हा पायंडा शिवचरित्राची ख्याती सर्वदूर पोहोचविणारा ठरणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनपर कार्यक्रम, महिलांसाठी व्याख्यान, वृक्षारोपण, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.

चुकीच्या पद्धतींना फाटा देण्याचा विडा येथील तरुणांनी उचलला आहे. फक्त नाव शिवरायांचे आणि वागणे विरुद्ध असा प्रकार नको, या मतावर सारेच तरुण ठाम आहेत. त्यामुळे डीजे लावून नाचण्याचा प्रकार मोडीत निघत आहे. राजकारण, मतभेद अशा गोष्टी टाळत सर्व जातीधर्माच्या लोकांनी सामील होऊन शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार केला आहे. या सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळात कोणीही अध्यक्ष, प्रतिनिधी नाही. प्रत्येक जण पद न पाहता स्वत:ला शिवरायांचा मावळा समजून झटत आहे.

आदर्श शिवजयंती- दररोज जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली जाते. वडवळ येथे गेल्या वर्षापासून गावातील सर्वच तरुणांनी, ग्रामस्थांनी एकत्र येत एकमुखी निर्णय घेऊन ‘एक गाव-एकच शिवजयंती’ साजरी करण्यास प्रारंभ केला. तरुणांच्या या आवाहनाला प्रतिसाद तर मिळालाच; सोबतच व्याख्यानमाला, वेशभूषा स्पर्धा, व्यसनमुक्ती, डीयेबंदी यांसारखे उपक्रम ‘आदर्श शिवजयंती’ म्हणून पाळण्यात आले. हाच निर्धार कायम ठेवत यावर्षी देखील विधवा महिलांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजLokmatलोकमत