शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
2
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
3
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
4
विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा!
5
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
6
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
7
बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या
8
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया
9
AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५.४ षटकांत मिळवला 'मोठ्ठा' विजय; सुपर-८ चे तिकीट कन्फर्म
10
Monsoon: आभाळमाया बरसली, शेत-शिवारं भिजली, मान्सूनची जळगाव, अकोल्यापर्यंत धडक
11
'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत
12
AUS vs NAM : नवख्या संघाला ऑस्ट्रेलियानं स्वस्तात गुंडाळलं; कांगारूंचा दबदबा कायम, झाम्पाचा 'चौकार'
13
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही
14
केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका
15
SL vs NEP : पावसानं श्रीलंकेला बुडवलं! दक्षिण आफ्रिकेची चांदी; पाकिस्तानची डोकेदुखी वाढली
16
उद्धवसेना-काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी, विधान परिषद निवडणुकीचे निमित्त
17
फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका
18
जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
20
Palghar: भ्रष्टाचाराच्या पैशांवरून अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, जव्हार कृषी विभागात घडला प्रकार

किल्लारी भूकंपातील मृतांच्या दहनानंतर प्रथमच महामारीत विद्युत दाहिनीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:16 PM

कर्मचाºयांचे अनुभव; धुराड्यातून सतत बाहेर पडतोय धूर; नवीन दाहिनीचे काम सुरू

ठळक मुद्दे आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईलदाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होतेमृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो, जळाल्यानंतर हाडांची पावडर होते

राकेश कदमसोलापूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये १९९३ साली भूकंप झाला होता. त्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमधून मोठ्या संख्येने मृतदेह मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत आले होते. तेव्हा पहिल्यांदा या विद्युत दाहिनीचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले होते. आता कोरोनाच्या काळात आणखी एका दाहिनीची गरज निर्माण झाली. त्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली.

मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी खरे तर १९८४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ती १९९१ मध्ये बसवण्यात आली. यानंतरच तिचा वापर सुरू झाला. लोक पारंपरिक पद्धतीने लाकडाची चिता रचून दहन करण्यास प्राधान्य देत होते. आजही अनेक लोक देतात. 

किल्लारीच्या भूकंपात मरण पावलेल्या अनेक लोकांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. त्यामुळे या मृतदेहांचे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग आठ दिवस अनेक मृतदेह या दाहिनीमध्ये आल्याचे महापालिकेचे मशीन आॅपरेटर शिवलिंग हिरेमठ यांनी सांगितले. हिरेमठ १९९१ पासून विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करीत आहेत. परंतु, या दाहिनीवर कोरोनाच्या काळात पहिल्यांदा मोठा ताण पडल्याचे ते सांगतात. 

कोरोनाबाधित मृतदेहांसह न्यूमोनिया किंवा इतर आजाराने बाधित मृतदेहांचे दाहिनीत दहन करण्यात येत आहे. दररोज सरासरी चार ते पाच मृतदेहांचे दहन होत आहे. कारखान्याच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडतो. या दाहिनीत दररोज पाच ते सहा मृतदेहांचे दहन होत आहे. दाहिनीच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडत असल्याचे आजूबाजूचे लोक सांगतात. त्यांनाही या धुराचा त्रास होऊ लागला आहे.

देखभाल मोठे जिकिरीचे काम- दाहिनीची देखभाल दुरुस्ती हे जिकिरीचे काम असल्याचे मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी सांगतात. दाहिनी सतत तापलेली असते. मृतदेहाचे दहन करताना तापमान ६०० ते ६५० डिग्री असते. दाहिनीचा बाहेरचा पार्ट खराब झाला तर बदलण्यासाठी तापमान कमी होण्याची वाट पाहावी लागते. त्यासाठी एक दिवस तरी जातो. दाहिनीचा आतील पार्ट खराब झाला असेल तर मशीनही बंद ठेवावे लागते. हे थंड होण्यासाठी दीड ते दोन दिवस लागतात. त्यानंतर काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तापविण्यासाठी अर्धा दिवस जात असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. अनेक साहित्य पुण्यावरून मागवावे लागते.

आता अनेक जण रक्षाही मागायला आले नाहीत...- दाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होते. मृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो. जळाल्यानंतर हाडांची पावडर होते. इतर काळात लोक तिसºया दिवशी ही राख घेऊन जायला येतात. कोरोनाच्या काळात काही मोजके नातेवाईक राख घेऊन गेले. राखेतूनही कोरोना होईल, या भीतीमुळे निम्म्यापेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक राखही घेऊन जायला आले नाहीत.

तो दिवस भीतीदायक - गेल्या दोन महिन्यात ही दाहिनी तीन वेळा बंद पडली. पहिल्यांदा कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचारी हातात पाना घ्यायला तयार नव्हते. तो दिवस भीतीदायकच होता. या दिवशी विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी पुढे आले. रात्री-अपरात्री या ठिकाणी थांबून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता सर्वांचीच भीती उडाली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईल, असे हिरेमठ म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू