शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२० ऑगस्टला पहिली यादी; ‘विज्ञान’च्या ५ हजार जागांसाठी २० हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 15:57 IST

सोलापूर एज्युकेशन; ‘अकरावी’साठी वाणिज्यला दुसºया क्रमांकाची पसंती

ठळक मुद्देराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केलाअकरावीच्या प्रवेशासाठी ३१ जुलै ते १३ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत होती२० आॅगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी, ३१ आॅगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी

सोलापूर : अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत गुरुवारी संपली.  गुरुवारपर्यंत विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखेतून जवळपास ३५ हजार अर्ज आले आहेत.  यात विज्ञान शाखेसाठी शहरात ५ हजार १६० जागा असून, यासाठी २० हजार ७७१ अर्ज आले आहेत. यानंतर वाणिज्य शाखेसाठी अर्ज आले आहेत.

यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन राबविण्यात येत आहे़ यासाठी सर्व महाविद्यालयांना संकेतस्थळ अथवा लिंक तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़  सोलापूर शहरात अकरावीच्या एकूण ६२ महाविद्यालये आहेत.  यातील ५६ शाळांनी अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांची माहिती दिली आहे़. वाणिज्य शाखेचे शहरात ३ हजार ७२०, जिल्ह्यात ३२४० जागा आहेत़  यात शहरातील जागांच्या जवळपास तिप्पट अर्ज म्हणजे ९ हजार ७०७ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत आणि शहरात कला शाखेचे ५ हजार ४४० जागा असून, त्यासाठी ४ हजार १२६ म्हणजे जागांपेक्षा अर्ज कमी आले आहेत.

शहरात विज्ञान शाखेसाठी वालचंद महाविद्यालयात सर्वात जास्त ६ हजार ११८, दयानंद महाविद्यालयात ३ हजार ५० आणि संगमेश्वर महाविद्यालयात २ हजार ५५२ व त्यानंतर ए़  डी़  जोशी महाविद्यालयात १ हजार ७४१ अर्ज दाखल झाले आहेत़  तर वाणिज्य शाखेसाठी हिराचंद नेमचंद महाविद्यालयात ३ हजार ४०, डी़  ए़  व्ही. महाविद्यालयात १ हजार ३६१ आणि संगमेश्वर महाविद्यालयात १ हजार ५४६ अर्ज आले आहेत.

याप्रमाणे जाहीर होणार गुणवत्ता यादी...राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी ३१ जुलै ते १३ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत होती़  १४ ते १९ पर्यंत महाविद्यालय स्तरावर अर्जांची छाननी होणार आहे़़  २० आॅगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी, ३१ आॅगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय