सोलापूरात कापसाच्या कारखान्याला भीषण आग ; ४० लाखाचे नुकसान --सोलापूर : सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एंटरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ दरम्यान, सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत श्री गणेश एंटरप्रायझेस कंपनी आहे़ या कंपनीत कापूस व त्यापासून तयार होणारे कापडांची निर्मिती करण्यात येते़ मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कारखान्यामध्ये खराब कापूस व चर्चापनावर कचरा चिंद्या जमा करुन त्या पिंजल्या जातात़ स्वछ केलेला कापूस मशिनरी पुसण्यासाठी विकला जातो. आज दुपारी सुमारे दहा कामगार कंपनीतील आतील बाजूस कापूस पिंजण्याचे काम मशिनवर करत असताना अचानक मशिनमधील कापसाला आग लागली. कडक उन्हाआग इतकी भीषण होती की चार अग्निशामक दलाच्या बंबानेही ती आटोक्यात आली नाही़ त्यासाठी आणखी खाजगी पाण्याचे टँकर मागविण्यात येत होते़ आगीत कारखान्याचे सुमारे त्यात सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. उन्हाळ्यामुळे कारखान्यातील कापूस व मशिनरीही तापल्या असल्याने आगीने काही मिनिटात रौद्र रुप घेतले. अह्निशामक कडून चार बंबाव्दारे आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सोलापूरात कापसाच्या कारखान्याला भीषण आग ; ४० लाखाचे नुकसान
By admin | Updated: March 7, 2017 17:46 IST