शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकिळेचे प्राण वाचविण्यासाठी धावले अग्निशामक दलाचे जवान; मांजातून केली सुटका!

By रवींद्र देशमुख | Updated: February 1, 2024 14:14 IST

मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा कॅम्प शाळेसमोरील पिंपळाच्या झाडावर मांज्यामध्ये कोकिळेचा एक पाय अडकलेला होता.

सोलापूर: सकाळची वेळ. मुलांनी एव्हाना शाळेच्या गेटमधून प्रवेश केला होता..वर्गात बेंच पकडताना त्यांचा गोंगाट सुरू झालेला..इतक्यात कोकीळेचं आर्त केकाटनं कानी पडू लागलं. पिंपळाच्या झाडावर माजांत अडकून ती जखमी झाली होती..उंच झाड, तिला सुरक्षित उतरवणं थोडं कठीण..मग अग्निशामक जवान आले अन त्यांनी अलगद तिला जीवनदान दिलं.

मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा कॅम्प शाळेसमोरील पिंपळाच्या झाडावर मांज्यामध्ये कोकिळेचा एक पाय अडकलेला होता. सकाळपासून मांज्यातून स्वतःची सुटका करण्याचा  कोकिळेने अतोनात प्रयत्न केला. पण मांज्यामध्ये कोकिळेचा पाय गुंतलेला असल्याने बाहेर पडता येईना. कोकिळेचा जीव खूप तडफडत होता. शिक्षकांनी आवाज ऐकून कोकिळेचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण  झाडाच्या वरच्या शेंड्यावर असल्याने यश आले नाही.

तात्काळ सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दल शाखा गुरुनानक चौक यांना पाचारण केलं व त्यांच्या सहाय्याने कोकिळेला मांज्यातून सुटका मिळाली. यासाठी अग्निशमन दलाचे शामराव कोरे ,हनमंत कोंकल ,मन्सूर शेख ,कृष्णा इरकल यांनी मांज्यातून  अलगदपणे कोकिळेची सुटका केली.यासाठी  शाळेतील शिक्षक धोंडू केंगले ,राहुल नवले व आप्पासाहेब ककमारे यांनी परिश्रम घेतले. या कामाचे शाळेचे मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी कौतुक केले.

टॅग्स :Solapurसोलापूर