शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:05 IST

बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. 

ठळक मुद्देअग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात आग आटोक्यातआगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. सोमवारी ११ वाजून २७ मिनिटांनी अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांना बुधवार पेठेतून सिटीबस डेपोला आग लागल्याची खबर मिळाली. लागलीच भवानी पेठेतून एक गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. यावेळी चार गाड्यांच्या आतील सीट कव्हर आणि फायबर बॉडी जळत असल्याने आगीच्या ज्वाला खिडकीतून बाहेर पडत होत्या. तातडीने जवानांनी पाण्याचा फवारा मारला मात्र आग आटोक्यात येईनाशी झाली. दरम्यान एकापाठोपाठ अन्य सहा गाड्या धावल्या. चौफेर पाण्याचा फवारा करण्यात आला. काही गाड्यांच्या टायरने पेट घेतल्याने  आग आटोक्यात आणण्यासाठी फोब केमिकलचा वापर करण्यात आल्याचे अग्निशामकचे अधीक्षक केदार आवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दरम्यान, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्यासह पोलिसांची कुमकही घटनास्थळी दाखल झाली. मनपाचे सहा. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे, कार्यशाळा व्यवस्थापक एम. एस. पडगानूरसह अधिकाºयांनीही भेट दिली. ---------------कारण समजले नाही- आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस आयुक्तांनी तक्रार देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले असून, नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका