शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप बिल्डकॉन ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करा; स्वाभिमानीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 09:00 IST

सोलापूर लोकमत बातमी

मंगळवेढा : माचणूर येथे क्रेन चालकाच्या बेफिकिरीमुळे माजी उपसरपंच पप्पू पाटील यांचा टायरखाली चिरडून मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदार व प्रोजेक्ट मॅनेजरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली आहे.

मंगळवेढा-सोलापूर या महामार्गाचे चौपदरीकरण करताना नागरिकांच्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी फारशी  दक्षता न घेतल्याने या ठिकाणी आजपर्यंत  अपघातात चार बळी गेले आहेत. यापूर्वी मंगळवेढा-सांगोला नाका रोडवर पुलाचे काम सुरू असताना क्रेनचालकाकडून स्लॅबचा मोठा भाग खाली निसटल्याने एका वहानचालकाचा जागीच मृत्यू झाला होता त्याचबरोबर ब्रह्मपुरी एक शेतमजूर झोपला असताना त्याच्या अंगावर टिपर गेल्याने  चिरडून जागीच मृत्यू झाला होता. काही वहानचालक मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे सुसाट वाहने चालवीत असल्याच्या नागरिक, वाहनचालकाच्या तक्रारी आहेत. रस्त्यालगत गावावरील नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर यांचे दूर्लक्ष आहे त्यामुळे दिवसेंदिवस अशा अपघाती घटनांत वाढ होत आहे.

निष्पाप माजी उपसरपंच पप्पू पाटील हे आपल्या मार्गाने रस्त्यावरून जात असताना क्रेनने पाठीमागून धडक देऊन टायर डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की मेंदूचे तीन भाग झाले होते .नागरिकांच्या जिवाशी खेळ दिलीप  बिल्डकॉनच्या ठेकेदाराकडुन केला जात आहे, तरी या मृत्यूप्रकरणी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पप्पू पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना