शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची भीती; ‘एचआयव्ही’ रूग्णांच्या तपासणीत ७३.३१ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 14:22 IST

 २५ हजार ५६२ गर्भवतींची नियमित तपासणी सुरूच; संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना

ठळक मुद्देशाळा, महाविद्यालयात आरोग्य यंत्रणेमार्फ त एचआयव्ही संदर्भात जनजागृती मोहीम मागील तीन महिन्यात लॉकडाऊनमुळे केवळ २६़.६९ टक्के लोकांच्याच एचआयव्ही चाचण्या कोरोनाच्या भीतीमुळे शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या घटली

सोलापूर : मागील काही वर्षांत ‘एचआयव्ही’ बद्दल जनजागृती झाल्याने अनेक जण स्वत:हून तपासणीसाठी एआरटी केंद्रावर जाऊ लागले़ त्यामुळे तपासणीचे प्रमाण वाढले होते; परंतु कोरोनामुळे अनेकांमध्ये भीती निर्माण झाली़ त्याचा विपरित परिणाम एचआयव्हीच्या तपासण्यांवरही झाला़ मागील तीन महिन्यात केवळ गर्भवतींच्या नियमित एचआयव्ही झाल्यात, तर स्वत:हून येणाºया रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे़ लॉकडाऊन काळातील तीन महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी १२,४८२ जणांची एचआयव्ही चाचणी झाली आहे़ अर्थात तपासणीत ७३़३१ टक्क्यांनी घट झाली आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या घटली आहे. एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी सेंटरवर जाणाºयांमध्ये कोरोनाची भीती असल्याचे चित्र आहे़ त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या कालावधीत एचआयव्ही तपासणीसाठी येणाºयांची संख्या खूपच कमी झाली आहे, शिवाय या वातावरणात सामूहिक जनजागृतीवरदेखील परिणाम झाल्याने अनेकांनी स्वत:हून एचआयव्ही तपासणी करण्यास टाळल्याचे वास्तव आहे़ एचआयव्ही तपासणीसाठी सोलापूर शिवाय लातूर, उस्मानाबाद, सांगली, विजापूर, हैदराबादमधून बहुतांश लोक सोलापुरात यायचे़ लॉकडाऊनच्या तीन महिन्यात ४०,२२४ लोकांच्या एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट होते; मात्र कोरोनामुळे तपासणीसाठी येणाºयांचे प्रमाण घटले़ ट्रक चालक, फिमेल सेक्स वर्कर आणि मेल सेक्स वर्कर यांचीही संख्या घटली आहे.

अशातच एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील नऊपैकी काही कर्मचारी हे कोविड उपक्रमाकडे तात्पुरते वळविण्यात आले आहेत़ या तीन महिन्यात गरोदर मातांच्या चाचणीचे उद्दिष्ट हे २०, ८०० होते; मात्र प्रतिसादामुळे गरोदर मातांच्या तपासणीचे प्रमाण २५,५६५ वर पोहोचले़

बाधितांना औषधे घरपोचलॉकडाऊनमुळे बºयाच एचआयव्ही बाधितांना घराबाहेर पडता आले नाही़ ग्रामीण भागातून काही लोक सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात एआरटीच्या औषधांसाठी येत असताना रस्त्यामध्ये पोलिसांकडून अडवणूक झाली, काहींना काठीचा प्रसाद मिळाला़ परिणामत: मासिक उपचार आणि औषधे घेण्यासाठी येणाºयांची संख्याही घटली़ ते लोक धोकादायक अवस्थेत जगत आहेत़ त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी लॉकडाऊन काळात मुभा द्यावी अशी मागणी होत आहे़

शाळा, महाविद्यालयात आरोग्य यंत्रणेमार्फ त एचआयव्ही संदर्भात जनजागृती मोहीम राबविली जाते़ शिवाय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एचआयव्ही चाचण्या केल्या जातात; परंतु कोरोनाच्या फैलावामुळे या घटकांपर्यंत पोहोचता आले नाही; मात्र गावोगावी जाऊन चाचणी शिबिरे घेत आहोत़ मागील तीन महिन्यात लॉकडाऊनमुळे केवळ २६़.६९ टक्के लोकांच्याच एचआयव्ही चाचण्या करता आल्या.- भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यHIV-AIDSएड्सMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या