शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा; खुनाचा अवघ्या १२ तासाच्या आत उलगडा

By appasaheb.patil | Updated: November 16, 2023 15:32 IST

पथकास मयताच्या राहत्या गावी जावून मयताबाबत माहिती काढण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

सोलापूर : दारूच्या नशेत घरातील लोकांना त्रास देणा-या बापाचा मुलानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात सोलापूर ग्रामीण पेालिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्याच त्रासास कंटाळून मी वडिलांची हत्या केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली. 

दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना पोलिसांना कळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जलदगतीने तपास करण्यास सुरूवात केली. दरम्यान, या गुन्हयातील अनोळखी व्यक्ती ही कोंडबावी (ता. माळशिरस) या गावातील असल्याची माहिती मिळाली. मयताचा मुलगा सुरज सावंत याने प्रेत ओळखून माझे वडिल पांडूरंग चंद्रकांत सावंत याचेच प्रेत असल्याचे सांगितले. तेंव्हा मयताचा मुलगा सुरज पांडूरंग सावंत (वय २४) याने अज्ञात व्यक्तीविरूध्द फिर्याद दिली होती.

या गुन्हयातील मयत हा कोंडबावी गावचा रहिवाशी असल्याने पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास मयताच्या राहत्या गावी जावून मयताबाबत माहिती काढण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सुचनेनुसार पेालिस गावात पोहोचले. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करीत असताना मयताच्या मुलानेच मयतास मारल्याचे सांगण्यात आले. या माहितीवरून मयताच्या मुलास पेालिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी करीत असताना मयताच्या मुलाने सांगितले की, माझे वडिल हे मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन सारखे सर्वांना शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्यांचे त्रासास कंटाळून वडिल घरी आल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये कोंडून लोखंडी गजाने वार करून जिवे ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पेालिसांनी मयताच्या मुलास अटक केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रविण सपांगे हे करीत आहेत.

 सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पेालिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस  निरीक्षक नागनाथ खुणे, सफौ/ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड यांनी बजावली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर