शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...; सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या झाली १०२...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 20:27 IST

आज दिवसभरात २१ वाढले: सहा मुलांनाही झाली 'कोरोना'ची लागण...!

ठळक मुद्देपाच्छापेठेतील महिलेची दुबार चाचणीसंपर्कातील व्यक्तींना होतेय लागणरेल्वे व ईएसआय या नव्या ठिकाणी उपचार सुरू

सोलापूर : बापरे...सोलापुरात आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात सोलापुरातील जुन्याच ७ हॉटस्पॉट भागात २१ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत. त्यात १४ पुरूष व ८ महिलांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी गुरूवारी दिली.

सोलापुरात कोरोनाा रुग्णांची संख््या वरचेवर वाढतच चालल्यामुळे चिंता वाढली आहे. बुधवारी १३ तर गुरूवारी २१ रुग्ण आढळले. विशेष धक्कादायक बाब म्हणजे यात सात ७ ते १२ या वयोगटातील सात मुले आहेत. शहरातील हॉटस्पॉटमध्येच हे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शास्त्रीनगरमध्ये, उत्तर सदर बझार, कुर्बानहुसेनगर, नईजिंदगी,  तेलंगी पाच्छापेठ, शानदार चौक, आणि मोदी या भागातील रुग्ण आहेत. 

 शास्त्रीनगर, मोदी, नई जिंदगी आणि कुर्बानहुसेनगरात रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. नव्याने आढळलेले हे रुग्ण पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्वॅब घेतल्यावर पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आता उपचारासाठी आयसोलेशनमध्ये हलविण्यात आले आहे.

पाच्छापेठेतील महिलेची दुबार चाचणी

यापूर्वी पॉझीटीव्ह आढळल्याने तेलंगी पाच्छापेठेतील रुग्णांचे १४ दिवस झाल्याने त्यांची दुबार चाचणी घेण्यात आली. यामध्ये ५२ वर्षाच्या महिलेची दुबार चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे तिला या नव्या रुग्णांबरोबर पॉझीटीव्ह रुग्ण म्हणून गणना करण्यात आली आहे.

संपर्कातील व्यक्तींना लागण

यापूर्वी पॉझीटीव्ह रुग्ण आळलेल्या ठिकाणच्या व्यक्तींना केगाव येथील निरीक्षण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १८ व्यक्तींचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर एक महिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील आहे.

नव्या ठिकाणी उपचार सुरू

कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा आकडा शंभर झाला आहे. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण दुबार आहे. अशा ९४ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने आता होटगीरोडवरील विमा हॉस्पीटल व रेल्वे लाईनमध्यील रेल्वे हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांना अ‍ॅडमिट करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस