शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात शेतकºयांना दुचाकी वापरण्यास दिली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:56 IST

आदेशात दुरुस्ती; खरेदी-विक्री नोंदणी बंद, न्यायालयाचे कामकाजही चालणार

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग कमी करणे व अँटिजन किटद्वारे चाचण्या वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संचारबंदी घोषित बार्शी, मोहोळ, अक्कलकोट या तीन शहराबरोबरच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २७ गावांमध्ये कडक संचारबंदी लागू न्यायालयीन कामकाज सुरू राहणार अशी दुरुस्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले

सोलापूर : सोलापूर शहराबरोबरच दक्षिण,उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ आणि अक्कलकोट शहरातील शेतकºयांना शेतावर ये-जा करण्यासाठी दुचाकी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच वरील तिन्ही शहर व जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू असणार आहे, अशी संचारबंदीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करणे व अँटिजन किटद्वारे चाचण्या वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये बार्शी, मोहोळ, अक्कलकोट या तीन शहराबरोबरच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २७ गावांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्याचे नियोजन केले आहे. 

गेल्या आठवड्यात या गावातील संसर्ग पाहून पोलीस अधीक्षकांनी हा प्रस्ताव दिला होता. तहसीलदार व प्रांताधिकाºयांमार्फत संबंधित गावांचा अहवाल घेण्यात आला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशात शेतकºयांना दुचाकी वापरावर बंदी घातली होती. पण शेतातून ये-जा करणे, वैरण, दूध, पाणी यासाठी दुचाकी आवश्यक असल्याचे निदर्शनाला आणून दिल्याने ही बंदी मागे घेण्यात आली आहे. तसेच न्यायालयीन कर्मचाºयांना सवलत दिल्याचे आदेशात नमूद आहे. त्यात न्यायालयीन कामकाज सुरू राहणार अशी दुरुस्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. संचारबंदीच्या चर्चेवेळी अनेकांचा विरोधही झाला होता, पण आता कारण पटल्याने व्यापाºयांची सहमती झाल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीचा कालावधी दहा दिवसांचा असला तरी त्यात सुटीचे दिवस व सम-विषम तारखेचा विचार केला तर पाच दिवस दुकाने बंद राहणार आहेत.  गेल्या आठवड्यात आढळलेल्या रुग्णसंख्येवरून ३७ गावांसाठी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे़

यासाठी पास केला बंधनकारकसोलापूर शहरातून भोवतालच्या गावात संसर्ग वाढत असल्याने बाधित गावात कडक संचारबंदी लागू केली आहे. शहराकडे दूध विक्रीसाठी येणाºयांना संबंधित पोलीस ठाण्यांकडून पास घेणे बंधनकारक केले आहे. यापूर्वीच्या संचारबंदीत दूधवाल्यांना सवलत दिल्यावर काहीजण नुसतेच कॅन्ड अडकावून शहरात येत होते असे दिसून आल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. या काळात दूध दरवाढ होणार नाही याकडे प्रशासनाचे लक्ष असणार आहे.  

वाढू शकतात गावं...गेल्या आठवड्यात आढळलेल्या रुग्णसंख्येवरून शहराभोवतीच्या ३७ गावांसाठी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. पण गेल्या चार-पाच दिवसात वाढलेले रुग्ण विचारात घेता, मंद्रुप, भंडारकवठे, हत्तूर, कंदलगाव अशा गावांबाबात माहिती घेऊन दोन दिवसात सुधारित आदेश निघू शकतो अशी शक्यता जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केली.

संचारबंदीत प्रशासन हे करणारसंचारबंदीचा अंमल सुरू झाल्यावर अंमलबजावणीसाठी पोलीस रस्त्यावर असतील. संचारबंदी ज्या कारणासाठी लागू केली त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज राहणार आहे. महापालिका हद्दीत २५ हजार तर जिल्ह्यात ६ हजार अ­ँटिजन रॅपिड किटद्वारे संशयित रुग्णांची तपासणी करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महापालिकेकडे सध्या ५ हजार किट आल्या आहेत, दोन दिवसात २0 हजार किट येतील. ग्रामीणमध्ये अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, वैराग व संसर्ग जादा असलेल्या गावात या किटचा वापर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय